New Holland 5630 TX Plus : न्यू हॉलंड 5630 TX Plus हा 75 HP क्षमतेचा एक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, जो दमदार परफॉर्मन्स आणि इंधन बचतीसाठी ओळखला जातो. यात 12+3 गिअरबॉक्स, 2000 किलो वजन उचलण्याची क्षमता असून, हा शेती आणि व्यावसायिक कामांसाठी उत्तम आहे. 

Tractor News: भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून उच्च दर्जा, इंधन बचत आणि टिकाऊपणा यासाठी ओळखली जाणारी न्यू हॉलंड (New Holland) कंपनी नेहमीच परफॉर्मन्समध्ये आघाडीवर राहिली आहे. मजबूत इंजिन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या कंपनीचे ट्रॅक्टर शेती आणि व्यापारी कामांसाठी सर्वोत्तम ठरतात. अशातच New Holland 5630 TX Plus हा ट्रॅक्टर आज शेतकऱ्यांच्या पसंतीत अव्वल ठरत आहे. या ट्रॅक्टरची दमदार पॉवर, आकर्षक फिचर्स आणि उच्च कार्यक्षमता यामुळे तो महिंद्रासह इतर प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देतो. तर चला, जाणून घेऊया त्याची खासियत आणि किंमत. 

5630 TX Plus ची दमदार वैशिष्ट्ये

75 HP पॉवरफुल इंजिन

New Holland 5630 TX Plus मध्ये 75 अश्वशक्तीचे शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.

2300 RPM वर स्मूथ परफॉर्मन्स

नांगरणी, रोटाव्हेटिंग, कल्टीवेशन यांसारखी कठीण शेतीकामे सहज पार पाडतो

पॉवर जास्त असली तरी इंधन बचतीसाठी ओळखला जातो

मजबूत गियरबॉक्स, पूर्ण नियंत्रण तुमच्या हातात

या ट्रॅक्टरमध्ये 12 फॉरवर्ड + 3 रिव्हर्स गियर आहेत.

पुढील वेग : 14 – 32.07 किमी/तास

रिव्हर्स वेग : 3.04 – 16.21 किमी/तास

यामुळे कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये किंवा परिस्थितीत उत्कृष्ट नियंत्रण मिळते आणि कामाची गती कायम राहते.

2000 किलोची लिफ्टिंग क्षमता

या ट्रॅक्टरची लिफ्टिंग क्षमता 2000 किलो असून जड शेती उपकरणे, ट्रॉली किंवा व्यापारी लोड सहज उचलू शकतो.

म्हणूनच हा ट्रॅक्टर शेतीबरोबरच व्यावसायिक वापरासाठीही उत्तम पर्याय ठरतो.

किंमत किती?

भारतामध्ये New Holland 5630 TX Plus ची एक्स-शोरूम किंमत साधारण 14.60 लाख रुपये आहे.

(राज्यानुसार RTO, विमा आणि रोड टॅक्सनुसार किंमतीत बदल होऊ शकतात.)

कंपनी या मॉडेलवर 6 वर्षांची वॉरंटी देते, जी या सेगमेंटमध्ये मोठी सुविधा मानली जाते.

New Holland 5630 TX Plus हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त पर्याय

शक्तिशाली इंजिन, उत्कृष्ट नियंत्रण, जड भार उचलण्याची क्षमता आणि टिकाऊ बांधणीमुळे New Holland 5630 TX Plus हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त पर्याय ठरतो. कार्यक्षमतेच्या बाबतीत तो अनेक प्रिमियम ब्रँडना मजबूत स्पर्धा देतो.