Sonalika CNG Tractor Launch : सोनालिका कंपनीने नागपूरमधील 'अॅग्रोव्हिजन' कृषी मेळाव्यात आपला नवीन CNG/CBG ट्रॅक्टर सादर केला आहे. हा ट्रॅक्टर आधुनिक तंत्रज्ञान, 40 किलोची मोठी इंधन क्षमता आणि शक्तिशाली इंजिनसह येतो.
Sonalika CNG Tractor Launch: भारतीय शेतीत आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची लाट जोर धरत आहे. वाढते इंधन दर, प्रदूषण आणि शेतीवरील वाढता खर्च या सर्व समस्यांवर उपाय म्हणून अनेक कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान बाजारात आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. सोनालिका कंपनीने आपला नवीन CNG/CBG ट्रॅक्टर भव्य पद्धतीने बाजारात दाखल केला आहे. नागपूरमधील कृषी मेळावा ‘अॅग्रोव्हिजन’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत या ट्रॅक्टरचे अधिकृत लोकार्पण झाले.
काय खास आहे सोनालिकाच्या या CNG ट्रॅक्टरमध्ये?
या नवीन ट्रॅक्टरची रचना पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, शेतकऱ्यांच्या कामाचा वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष फीचर्स देण्यात आले आहेत.
मुख्य फीचर्स
2000 RPM चे शक्तिशाली इंजिन
2+3 कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन
साइड-शिफ्ट गिअर तंत्रज्ञान
14.9×28 आकाराचे मोठे मागील टायर्स
मोठ्या टायरमुळे नांगरणी, फवारणी, ढकलणी, वाहतूक अशा सर्व शेतीकामात अधिक स्थिरता व ताकद मिळते.

इंधन क्षमतेत जबरदस्त वाढ, वारंवार CNG भरण्याची गरज नाही!
या ट्रॅक्टरमध्ये एकूण 40 किलो इतकी इंधन क्षमता असून
14 किलो + 27 किलो
असा ड्युअल सिलिंडर सेटअप देण्यात आला आहे.
या क्षमतेमुळे एकदा भरल्यानंतर ट्रॅक्टर दीर्घकाळ सतत काम करू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
ग्रामीण वाहतुकीसाठी खास ट्रॉली सेटअप
अॅग्रोव्हिजनमध्ये कंपनीने या ट्रॅक्टरसोबत
ग्रामीण वाहतुकीसाठी खास तयार केलेला ट्रॅक्टर–ट्रॉली सेटअपही सादर केला.
ट्रॅक्टर–ट्रॉलीचा उपयोग :
शेतमाल बाजारात नेण्यासाठी
जनावरांसाठी चारा वाहतुकीसाठी
खत–बियाणे पुरवठ्यासाठी
अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यामुळे हा ट्रॅक्टर फक्त शेतीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण जीवनातील सर्वांगीण गरजांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.


