Toyota Land Cruiser Achieves Highest Monthly Sales : टोयोटाची लँड क्रूझर ही सर्वात कमी विकली जाणारी कार ठरली आहे, पण तरीही नुकत्याच झालेल्या 74 युनिट्सच्या विक्रीमुळे या वर्षातील सर्वाधिक मासिक विक्रीची नोंद झाली आहे.

Toyota Land Cruiser Achieves Highest Monthly Sales : टोयोटाची लँड क्रूझर पुन्हा एकदा सर्वात कमी विकली जाणारी कार ठरली आहे. तरीही, गेल्या महिन्यात 74 युनिट्स विकल्या गेल्याने या वर्षातील सर्वाधिक मासिक विक्रीची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये फक्त 27 युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून लँड क्रूझरला विक्रीचे खातेही उघडता आले नव्हते. लँड क्रूझरच्या मर्यादित विक्रीचे एक कारण म्हणजे तिची प्रचंड किंमत. लँड क्रूझरची एक्स-शोरूम किंमत 2.16 कोटी ते 2.25 कोटी रुपयांपर्यंत आहे. किमतीमुळे मोजकेच लोक ही कार खरेदी करु शकतात. पण या कारची क्रेझ आजही कायम आहे. अनेक कारचे कलेक्शन असले तरी दैनंदिन वापरासाठी लोक या कारचा वापर करतात. 

टोयोटा लँड क्रूझर 300 मध्ये मस्क्युलर हुड, टोयोटा लोगोसह ब्लॅक-आउट ग्रिल, गोलाकार हेडलॅम्प आणि DRLs सह एलईडी फॉग लाइट्स दिले आहेत. यामध्ये चौकोनी खिडक्या, साइड-स्टेपर्स, ब्लॅक फेंडर्स आणि 16-इंचाची व्हील्स देखील आहेत. या एसयूव्हीमध्ये एसी व्हेंट्सभोवती सिल्व्हर ॲक्सेंट, दोन यूएसबी पोर्ट, सेंटर कन्सोलवर रेट्रो लँड क्रूझर लोगोसह वूडन डॅशबोर्ड आणि थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

लँड क्रूझरला 3.5-लिटर ट्विन-टर्बो V6 डिझेल इंजिनमधून पॉवर मिळते. हे इंजिन 415 PS पॉवर आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. यात 3.3-लिटर ट्विन-टर्बो V6 डिझेल इंजिनचा पर्यायही आहे, जे 309 PS पॉवर आणि 700 Nm टॉर्क निर्माण करते. ही दोन्ही इंजिने 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेली आहेत. टोयोटा लँड क्रूझर 300 ला 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते.

हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा..