Top Selling CNG Car : भारताची नंबर 1 CNG कार कोणती?, लोक करतायेत तुफान खरेदी
Top Selling CNG Car : आर्थिक वर्ष 2025 मध्ये, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे CNG गाड्यांची मागणी वाढली आहे. वॅगनआर आणि टाटा पंच सारख्या मॉडेल्सनीही उत्तम विक्री नोंदवली आहे. CNG सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी आपले वर्चस्व कायम ठेवत आहे.

नंबर 1 CNG कार
FY2025 मध्ये इंधन दरवाढीमुळे CNG गाड्यांची मागणी वाढली आहे. दैनंदिन खर्च कमी होत असल्याने आणि शहरांमध्ये CNG स्टेशन्स वाढल्याने अनेक CNG मॉडेल्स विक्रीत आघाडीवर आहेत.
मारुती सुझुकी अर्टिगा
या यादीत मारुती सुझुकी अर्टिगा CNG पहिल्या क्रमांकावर आहे. FY2025 मध्ये 1,29,920 युनिट्सची विक्रमी विक्री झाली. 7-सीटर, चांगले मायलेज आणि कमी खर्चामुळे मोठ्या कुटुंबांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
वॅगनआर CNG
वॅगनआर CNG (1,02,128 युनिट्स) दुसऱ्या आणि डिझायर CNG (89,015 युनिट्स) तिसऱ्या स्थानी आहे. SUV मध्येही CNG मॉडेल्स लोकप्रिय होत आहेत. टाटा पंच CNG (71,113) आणि मारुती ब्रेझा CNG (70,928) यांची चांगली विक्री झाली आहे.
टॉप 10 CNG कार्स
FY2025 च्या टॉप 10 CNG गाड्यांमध्ये मारुतीचे 7 मॉडेल्स आहेत, जे तिचे वर्चस्व दाखवते. नेक्सॉन, XL6, ग्रँड विटारा सारख्या नवीन मॉडेल्सनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी खर्चामुळे भविष्यात CNG बाजारपेठ आणखी वाढेल.

