- Home
- Utility News
- Tata Harrier and Safari : टाटा कारच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'ही' फीचर्स पाहिल्यावर तुम्हीही करणार खरेदी...
Tata Harrier and Safari : टाटा कारच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'ही' फीचर्स पाहिल्यावर तुम्हीही करणार खरेदी...
best car : टाटा मोटर्सने आपल्या हॅरियर आणि सफारी SUV नव्या 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच केल्या आहेत. ही मॉडेल्स प्रीमियम फीचर्स आणि 5-स्टार भारत NCAP सेफ्टी रेटिंगसह येतात.

टाटा हॅरियर
best car : टाटा मोटर्सने हॅरियर आणि सफारी या आपल्या महत्त्वाच्या SUV नव्या पेट्रोल इंजिनसह भारतीय बाजारात आणल्या आहेत. हॅरियर पेट्रोलची किंमत ₹12.89 लाख आणि सफारी पेट्रोलची ₹13.29 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या सुरुवातीच्या किमती असून काही महिन्यांत बदलू शकतात.
टाटाची नवीन कार
best car : दोन्ही SUV मध्ये नवीन 1.5-लीटर, 4-सिलेंडर हायपेरिअन टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक (टॉर्क कन्व्हर्टर) गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. टाटाच्या मते, ही गाडी पॉवरसोबतच मायलेजमध्येही सेगमेंटमध्ये पुढे असेल.
5 स्टार सुरक्षा
best car : इंटिरियरमध्ये मोठे बदल केले आहेत. हॅरियरला ऑयस्टर व्हाइट आणि टायटन ब्राउन, तर सफारीला कॉर्नेलियन रेड आणि ब्लॅक थीम दिली आहे. यात 36.9 सेमी इन्फोटेनमेंट स्क्रीन, डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ, डॅशकॅम, 19-इंच अलॉय व्हील्स असे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.
टाटा सफारी
best car : सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. पेट्रोल मॉडेल्सनाही भारत NCAP मध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. नवीन पेट्रोल इंजिनमुळे, या SUV अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचतील. हॅरियर मिड-साईज SUV आणि सफारी प्रीमियम 7-सीटर SUV सेगमेंटमध्ये स्पर्धकांना थेट आव्हान देईल.

