काळानुसार विकास आणि तंत्रज्ञानात प्रगती होत असल्याने माणसांचं आरोग्य सुधारत असल्याचा आपला समज असतो. पण खरंच असं होतंय का?

डोळे उघडणारं ब्रिटनचं संशोधन... लंडन युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन किंग्स कॉलेज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मिळून हे संशोधन केलं आहे.

त्यांनी ब्रिटनमध्ये १९४६ पासून जन्मलेल्या लोकांवर केलेल्या ५१ संशोधनांचं एकत्र विश्लेषण केलं.

१९४६ मध्ये जन्मलेल्यांचा एक गट,

१९५८ मध्ये जन्मलेल्यांचा दुसरा गट,

१९७० मध्ये जन्मलेल्यांचा तिसरा गट,

१९८९ - १९९० मध्ये जन्मलेल्यांचा चौथा गट,

आणि २००० नंतर जन्मलेल्यांचा एक वेगळा गट त्यांनी तयार केला.

प्रत्येक गटात लाखो लोक होते. जन्मापासून, लहानपणी, तरुणपणी आणि म्हातारपण येईपर्यंत दर काही वर्षांनी त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांची उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, हृदय, फुफ्फुसं आणि मानसिक आरोग्य नोंदवण्यात आलं.

त्यानंतर समान वय झाल्यावर, जुन्या पिढीची आणि नव्या पिढीची तुलना करण्यात आली. उदाहरणार्थ, जुन्या पिढीतील लोक ४४ वर्षांचे असताना कसे होते आणि नव्या पिढीतील लोक ४४ वर्षांचे असताना कसे होते, हे तपासण्यात आलं.

निकाल धक्कादायक होता...

४४ ते ४८ वर्षे वयोगटात:

जुन्या पिढीत मधुमेह: १०० पैकी ३ जण

नव्या पिढीत मधुमेह: १०० पैकी ६ जण

म्हणजेच दुप्पट वाढ!

एवढंच नाही. नव्या पिढीत लठ्ठपणा खूप जास्त आहे. रक्तदाब वाढलेला आहे. हृदयविकार लवकर येत आहेत. नैराश्य, चिंता आणि निद्रानाश यांसारख्या समस्याही नव्या पिढीत खूप जास्त आहेत.

१६ ते २४ वर्षे वयातच, नव्या पिढीच्या मुलांमध्ये नैराश्य आणि चिंता मोठ्यांपेक्षा जास्त दिसून आल्याचं हे संशोधन सांगतं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे:

पुढची पिढी...

जास्त शिकलेली आहे.

लहानपणापासून चांगली घरं, चांगलं अन्न आणि चांगल्या सुखसोयींमध्ये वाढली आहे.

जन्मापासून उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत.

तरीही, ते मोठ्यांपेक्षा जास्त आजारी आहेत. संशोधक याला 'पिढ्यानपिढ्या होणारी आरोग्याची हानी' म्हणत आहेत.

काही लोक म्हणतील... "यात काय, आता जास्त चाचण्या होतात म्हणून जास्त आजार समोर येतात."

पण हे डॉक्टर जास्त तपासण्या करतात म्हणून नाही. कारण लठ्ठपणा डोळ्यांना दिसतो, मधुमेह रक्त तपासणीत समजतो. नैराश्यही एकाच मानकानुसार सर्वांसाठी मोजलं गेलं.

एखादं छोटं संशोधन असतं तर चूक असू शकली असती. पण ५१ संशोधने, ७८ वर्षे आणि लाखो लोकांवर केलेल्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे.

असं का झालं?

मुख्य कारणं दोनच आहेत:

१. आहार बदलला.

आपल्या आजी-पणजीने खाल्लेला साधा आहार गेला. त्याऐवजी कारखान्यात बनवलेलं, रसायनांनी भरलेलं, साखर, बाहेरचं अन्न आणि पाकिटातील अन्न आलं. पोट भरतंय, पण शरीराला ताकद मिळत नाहीये.

२. हालचाल थांबली.

पूर्वीचे लोक चालायचे, शेतात काम करायचे, पायऱ्या चढायचे, सायकल चालवायचे.

पुढच्या पिढीचं आयुष्य खुर्चीत बसून काम, गाडीतून प्रवास आणि स्क्रीनसमोर बसण्यात जातंय.

सुखसोयी वाढल्या, पण शारीरिक हालचाल कमी झाली. शरीर कमकुवत झालं, मनही कमकुवत झालं.

हे ब्रिटनचं संशोधन असलं तरी आपल्या भारतात परिस्थिती याहूनही भयंकर आहे.

पुढची पिढीच जर अशी असेल, तर दिवसभर बसून, पाकिटातलं अन्न खाऊन, उशिरा झोपून आणि स्क्रीन बघणाऱ्या मुलांचं काय होईल?

संशोधक इशारा देत आहेत की त्यांना आणखी जास्त काळ आजारी राहून जगाव लागेल.

मस्त सोमवार - कडधान्ये

कॅल्शियम मंगळवार - दुग्धजन्य पदार्थ, तिळाचा लाडू

व्हेजी बुधवार - गाजर, काकडी

टेस्टी गुरुवार - पारंपरिक आहार

फ्रुटी शुक्रवार - फळे

सॅलड शनिवार, होम फूड रविवार

काळ बदलला आहे.

आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री.. सिनेतारका आणि क्रिकेटपटूंच्या माध्यमातून मुलांचं ब्रेनवॉश करत आहे. म्हणूनच फक्त उपदेश करून चालणार नाही.

मुलांच्या नसानसात हे शास्त्रीय विचार रुजवावे लागतील. त्यांना सवय लावावी लागेल.

"सगळंच अन्न नसतं. विष हे अन्न नाही. ते तुम्हाला आधी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा गुलाम बनवतं. आणि नंतर मोठ्या हॉस्पिटलचा. हा एक मॉडर्न गेम आहे.. मास्टर प्लॅन आहे." हे मुलांना सांगावं लागेल.

लहानपणी ज्या अन्नाची चव लागते, तीच त्यांच्या मेंदूत पक्की होते.

लहानपणीच जंक फूडची सवय लागली तर नंतर ती बदलणं खूप कठीण आहे.. खूपच कठीण.

कॅन्सर.. फॅटी लिव्हर आजार... बीपी.. लठ्ठपणा.. मधुमेह.. मानसिक नैराश्य.. यांसारख्या आजारांपासून स्वतःचं रक्षण करा.