- Home
- Utility News
- UPI ने चुकीच्या अकाउंटवर पैसे पाठवले? घाबरू नका, पैसे परत मिळण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत!
UPI ने चुकीच्या अकाउंटवर पैसे पाठवले? घाबरू नका, पैसे परत मिळण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत!
UPI : आजकाल प्रत्येकजण UPI आणि मोबाईल वॉलेटने पैसे पाठवतो. पण कधीकधी चुकून पैसे दुसऱ्याच अकाउंटमध्ये जातात. तुमच्यासोबतही असं झालं असेल, तर घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पैसे परत मिळवू शकता.

पैसे पाठवल्याचा पुरावा जपून ठेवा
सर्वात आधी तुमच्या पेमेंटचा पूर्ण पुरावा ठेवा. यात पेमेंटची पावती किंवा स्क्रीनशॉट, ट्रान्झॅक्शन आयडी, UTR नंबर, व्यवहाराची तारीख, रक्कम यांचा समावेश आहे. त्यानंतर कस्टमर केअर नंबर लक्षात ठेवा. हे नंबर तुम्हाला त्वरित मदत मिळवण्यासाठी उपयोगी पडतील.
UPI कस्टमर केअर नंबर
Google Pay: 1800-419-0157
PhonePe: 080-68727374 / 022-68727374
Paytm: 0120-4456-456
BHIM UPI: 1800-120-1740
कस्टमर केअरशी संपर्क साधा
चुकीच्या अकाउंटवर पैसे गेल्यानंतर लगेच तुमच्या GPay, PhonePe, Paytm, UPI ॲपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. त्यांना ट्रान्झॅक्शन आयडी, तारीख, रक्कम आणि पुराव्याची पूर्ण माहिती द्या. सर्व माहिती बरोबर आढळल्यास, सपोर्ट टीम NPCI कडे रिव्हर्सल रिक्वेस्ट पाठवते.
NPCI कडे तक्रार दाखल करा
ॲपची सपोर्ट टीम मदत करत नसेल, तर NPCI कडे तक्रार करा. npci.org.in वर 'Dispute Redressal Mechanism' फॉर्म भरा. त्यात सर्व तपशील द्या. NPCI बँकेला चौकशी करण्यास सांगते आणि चूक झाल्यास पैसे परत करण्याचे आदेश देते.
घाबरु नका
चुकून पैसे दुसऱ्या अकाउंटवर गेल्यास घाबरू नका. आधी कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि गरज पडल्यास NPCI पोर्टलवर तक्रार करा. लवकर आणि योग्यप्रकारे तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.

