सार
SBI कडून दोन नव्या योजना लाँच करण्यात आल्या आहेत. यामध्ये कमी रक्कमेची गुंतवणूक करत लाखो रुपये मिळवू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
SBI Investment Schemes : SBI कडून दोन नव्या योजना नुकत्याच लाँच करण्यात आल्या आहेत. यामधील एका योजनेचे नाव 'हर घर लखपती' असून दुसऱ्याचे नाव 'एसबीआय पॅटर्स एफडी स्किम' आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करत तुम्ही कोट्यावधी रक्कम मिळवू शकता. याशिवाय एसबीआयच्या रेकरिंग डिपॉझिट योजनेमध्येही गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो.
रिकरिंग डिपॉझिट नक्की काय आहे?
रिकरिंग डिपॉझिटमध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. यामध्ये कमीतकमी 1 रुपयांची गुंतवणूक करू शकता. योजनेमध्ये 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्षांच्या कालावधीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. रिकरिंग डिपॉझिटच्या योजनेत कमीतकमी 3 ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. प्रत्येक महिन्याला एक लहान रक्कम जमा करुन तुमच्या गरजेनुसार 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मिळवू शकता.
जर तुम्हाला 3 वर्षांमध्ये 1 लाख रुपये हवे असल्यास प्रत्येक महिन्याला केवळ 2 रुपये गुंतवावे लागतील. 5 वर्षांमध्ये 1 लाख रुपये हवे असल्यास प्रत्येक महिन्याला 10 रुपये तर 10 वर्षांनंतर 1 लाख रुपयांची गरज असल्यास प्रत्येक महिन्याला 93 रुपये जमा करावे लागतील.
SBI पॅटर्स एफडी योजना
एसबीआय पॅटर्स एफडी योजनेमध्ये खास फायदा वयोवृद्धांना होतो. यामध्ये कमीतकमी 1 हजार ते 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यासाठीचा गुंतवणूकीचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत असू शकतो.
आणखी वाचा :
EPFO पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी!, आता कोणत्याही बँकेतून मिळेल पेन्शन
आधार कार्डच्या माध्यमातून सुरू करू शकता पोस्टात खाते, वाचा नवे अपडेट