सार
देशभरात 6 जानेवारीपासून सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बायोमेट्रिकच्या माध्यमातून सिंगल सेविंग अकाउंट सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय जुन्या खातेधारकांना केवायसी अपडेट करावी लागणार आहे.
Post Office Savings Account 2025 : पोस्ट ऑफिसमध्ये केवळ आधार कार्डच्या माध्यमातून बचत खाते सुरू करण्यासह ई-केवायसीची प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या सुविधेचा लाभ केवळ पोस्ट ऑफिसच्या काउंटवरच करता येणार आहे. याशिवाय ग्राहकांचे ई-केवायसी आणि केवायसी अपडेट केले जाणार आहे.
पुढील टप्प्यात ई-केवायसीच्या माध्यमातून अन्य योजना जसे की, आरडी, टीडी, एमआयएस, एससीएसएसचे खाते सुरू करणे किंवा बंद करण्यासह ट्रांजेक्शनची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सध्या केवळ 5 हजार रुपयांचेच ट्रांजेक्शन केले जाणार आहे. याशिवाय 5 हजारांहून अधिक रक्कमेच्या ट्रांजेक्शनसाठी वाउचरचा वापर करावा लागणार आहे. या सर्व गोष्टी पोस्ट ऑफिसच्या फिनेकल सॉफ्टवेअर अंतर्गत काम करणार आहे.
आधार अपडेट करणे महत्वाचे
पोस्ट ऑफिसच्या नव्या आदेशानुसार, बेसिक सेविंग अकाउंट आणि सिंगल टाइप POSA (पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट) साठीच्या वेरिफिकेशच्या आधारावर फिनेकल सॉफ्टवेअरमध्येच खाते सुरू केले जाणार आहे. याशिवाय अन्य योजनांसाठी खाते सुरू करण्यासाठी ई-केवायसीची गरज भासणार आहे. एखाद्या व्यक्तीला पोस्ट ऑफिसमध्ये खाते सुरू करायचे असल्यास आधार कार्ड अपडेट नसल्यास त्याचे आधार बायोमॅट्रिकअंतर्गत खाते सुरू करता येणार नाही. यामुळे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात मिळणार काही सुविधा
ग्राहकांना पोस्ट ऑफिसच्या दुसऱ्या टप्प्यात ई-केवायसीच्या माध्यमातून खाते सुरू करणे , बंद करणे किंवा अन्य सुविधा सुरू करण्याची संधी मिळणार आहे. पोस्ट ऑफिस पेपरलेस वर्कसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पर्याय सध्या वापरत आहे. येणाऱ्या काळात पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट सुरु करणे, ट्रांजेक्शनसह काही गोष्टी करण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
आणखी वाचा :
५००० रुपयांतून सुरू करा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय, कमवा ४०-५० हजार
Redmi Note 13 256GB स्मार्टफोनवर धमाकेदार सूट, ऑफर संपण्याआधीच करा बुकिंग