- Home
- Utility News
- Rice Joggery Cake : घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेकरीसारखा स्पंजी राईस केक, वाढदिवसाला केक आणावा लागणार नाही
Rice Joggery Cake : घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेकरीसारखा स्पंजी राईस केक, वाढदिवसाला केक आणावा लागणार नाही
मुंबई - मैदा आणि साखर दोन्ही आरोग्याला योग्य नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदुळ आणि गुळापासून कसा आरोग्यवर्धक केक बनवू शकता हे सांगणार आहोत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या सोपी रेसिपी…

तांदूळ आणि गुळाचा स्पंजी केक
केक म्हणजे मैदा आणि साखर असाच समज असतो. पण आता आरोग्याची काळजी घेणारे मैदा आणि साखर टाळतात. त्यांच्यासाठी तांदूळ आणि गुळाचा हा स्पंज केक उत्तम पर्याय आहे. हेल्दी आणि मुलांनाही आवडेल.
हे साहित्य घ्या
केकसाठी लागणारे तांदूळ, गुळ, थोडे शिजवलेले भात/मुरमुरे, बेकिंग सोडा, व्हिनेगर, वेलची पूड, तूप हे सर्व साहित्य प्रत्येक घरी सहज उपलब्ध असते. नसेल तर बाजारातून घेऊन या. कोणत्याही दुकानात मिळेल.
केकला मऊपणा
तांदूळ धुवून ३ तास भिजवा. पाणी काढून मिक्सरमध्ये २ चमचे भात/१/४ कप मुरमुरे घालून बारीक वाटून घ्या. केक मऊ होण्याचे हेच गुपित आहे. वेलची पूड घातल्याने छान सुवास येतो. केकची चवही वाढते.
गुळाचे मिश्रण
गुळाचे छोटे तुकडे करून १/४ कप पाण्यात उकळवा. गुळ विरघळून पाक झाल्यावर गाळून तांदळाच्या मिश्रणात घाला. तुम्हाला तेवढा गोडवा हवा असेल तेवढा गुळ वापरा. काही जण फार कमी गोड खातात. त्यांच्या चवीप्रमाणे गुळ घेता येतो.
बेकिंग सोडा
तांदळाच्या मिश्रणात चिमूटभर बेकिंग सोडा, मीठ घालून मिसळा. केक मऊ होण्यास मदत होते. बेकिंग सोडा नसल्यास १/२ चमचा व्हिनेगर वापरा. त्यानेही केक मऊसुत होईल.
केक बनवणे
तुप लावलेला तवा गरम करून त्यावर एखादे गोल दोन्ही बाजूंना उघडे असलेले भांडे ठेवा. आता त्यात मिश्रण घाला. ३० सेकंद मोठ्या आचेवर, नंतर कमी आचेवर ३०-४० मिनिटे झाकून ठेवा. मध्ये तपासत राहा. केक शिजला आहे का ते बघण्यासाठी बोटाने स्पर्श करा. चिकटत असेल तर आणखी शिजवा. थंड झाल्यावर कापून घ्या.
मुलांच्या आरोग्यासाठी
तांदूळ-गुळाचा स्पंज केक तोंडात टाकल्यावर विरघळतो. मैदा-साखर नसल्याने मुलांसाठी हेल्दी. पारंपारिक पदार्थातून बनलेला हा मॉडर्न केक आहे. प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही असा केक बनवू शकतात. यात अंडे नसल्याने व्हेजिटेरिअन लोकही तो खाऊ शकतात.
घरी सहज बनवा
घरी सहज बनवता येणारा हा केक मुलांच्या वाढदिवसाला, छोट्या कार्यक्रमांना, स्पेशल जेवणाला उत्तम पर्याय आहे. बेकरीच्या केकसारखाच मऊ आणि चविष्ट केक तुम्ही घरी बनवू शकता.

