MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Jio Canva Pro Offer : जिओ युजर्ससाठी भारी ऑफर, 4 हजारांचं कॅनव्हा सबस्क्रिप्शन एकदम फ्री

Jio Canva Pro Offer : जिओ युजर्ससाठी भारी ऑफर, 4 हजारांचं कॅनव्हा सबस्क्रिप्शन एकदम फ्री

रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना एक मस्त सरप्राईज दिलंय. कंपनी आता १२ महिन्यांसाठी तब्बल ४,००० रुपये किमतीचं कॅनव्हा प्रो आणि कॅनव्हा प्रो लाईट सबस्क्रिप्शन फ्री देत आहे. मायजिओ ॲपवरून ही भन्नाट ऑफर कशी मिळवायची?

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 16 2026, 12:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
क्रिएटर्ससाठी तर ही दिवाळीच! १२ महिने कॅनव्हा प्रो फ्री.. जिओची भन्नाट ऑफर
Image Credit : Gemini AI

क्रिएटर्ससाठी तर ही दिवाळीच! १२ महिने कॅनव्हा प्रो फ्री.. जिओची भन्नाट ऑफर

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक कडक ऑफर आणली आहे. जिओने प्रसिद्ध व्हिज्युअल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म 'कॅनव्हा'सोबत पार्टनरशिप केलीय. या पार्टनरशिपमधून जिओ युजर्सना ४,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचं कॅनव्हा प्रो आणि कॅनव्हा प्रो लाईट सबस्क्रिप्शन एकदम फ्री मिळणार आहे. तुम्ही जर सोशल मीडिया क्रिएटर, विद्यार्थी असाल किंवा डिझायनिंग ॲप्स वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही खरंच खूप मोठी बातमी आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कोणत्या जिओ प्लॅनवर कोणती कॅनव्हा ऑफर मिळणार?
Image Credit : X/Canva

कोणत्या जिओ प्लॅनवर कोणती कॅनव्हा ऑफर मिळणार?

जिओ युजर्सना त्यांच्या रिचार्ज प्लॅननुसार कॅनव्हा सबस्क्रिप्शन मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार..

• ३९९ रुपयांचा प्लॅन: या प्लॅनने रिचार्ज करणाऱ्या युजर्सना कॅनव्हा प्रो (Canva Pro) सबस्क्रिप्शन फ्री मिळेल.

• ३४९ रुपयांचा प्लॅन आणि इतर प्लॅन्स: ३४९ रुपयांचा प्लॅन आणि दररोज 2GB डेटा देणाऱ्या ३४९ रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या निवडक प्लॅन्सवर कॅनव्हा प्रो लाईट (Canva Pro Lite) सबस्क्रिप्शन फ्री मिळेल.

या ऑफरमुळे युजर्स सलग १२ महिने प्रीमियम टूल्सचा फ्रीमध्ये आनंद घेऊ शकतात. यात कोणतेही छुपे चार्जेस नाहीत, असं जिओने स्पष्ट केलंय.

Related Articles

Related image1
UPI Transaction Fee : यूपीआय व्यवहारांवरील शुल्कावर आरबीआयचं स्पष्टीकरण, 'डिजिटल पेमेंट मजबूत करण्यासाठी पाऊल'
Related image2
Smartwatch : तुमच्या स्मार्टवॉचमागे हिरवा लाईट का लागतो? स्टाईल नाही, हे आहे खरं कारण
35
मायजिओ ॲपवरून फ्रीमध्ये कसं क्लेम करायचं?
Image Credit : Google

मायजिओ ॲपवरून फ्रीमध्ये कसं क्लेम करायचं?

ही बंपर ऑफर मिळवणं खूप सोपं आहे. युजर्सना यासाठी वेगळे पैसे देण्याची अजिबात गरज नाही.

१. तुमच्या स्मार्टफोनमध्ये मायजिओ (MyJio) ॲप ओपन करा.

२. ॲपमधील कॅनव्हा (Canva) ऑफर बॅनरवर टॅप करा.

३. ऑफर ॲक्टिव्हेट करा आणि डिझायनिंग सुरू करा.

ही ऑफर १६ सप्टेंबर २०२६ पासून जिओ रिचार्ज चॅनेल्स आणि मायजिओ ॲपवर उपलब्ध होईल.

45
कॅनव्हा प्रो आणि प्रो लाईटचे भन्नाट फीचर्स
Image Credit : X/Canva

कॅनव्हा प्रो आणि प्रो लाईटचे भन्नाट फीचर्स

कॅनव्हा प्रो सबस्क्रिप्शनमध्ये लाखो प्रीमियम टेम्पलेट्स, फोटोज, व्हिडिओज आणि फॉन्ट्सचा ॲक्सेस मिळतो. याशिवाय फक्त एका टॅपवर बॅकग्राउंड रिमूव्हल, मॅजिक इरेजर आणि मॅजिक रिसाईज यांसारखे भारी टूल्स वापरता येतात.

प्रो प्लॅनमध्ये ५ ॲडव्हान्स्ड ब्रँड किट्स, कंटेंट प्लॅनर, कॅनव्हा एआय चॅटबॉट, जास्त एआय युसेज लिमिट्स आणि 100GB क्लाउड स्टोरेज मिळतं. दुसरीकडे, प्रो लाईट प्लॅनमध्ये ३ बेसिक ब्रँड किट्स आणि 50GB क्लाउड स्टोरेज दिलं जातं.

55
फोनवरूनच डिझायनिंग.. क्रिएटर्ससाठी खूपच फायद्याचं
Image Credit : gemini

फोनवरूनच डिझायनिंग.. क्रिएटर्ससाठी खूपच फायद्याचं

या पार्टनरशिपमुळे कोणताही अनुभव नसलेले नवीन लोकही त्यांच्या फोनवरूनच सोशल मीडिया पोस्ट्स, प्रेझेंटेशन्स, ग्रीटिंग कार्ड्स आणि मार्केटिंग कंटेंट सहज बनवू शकतात. भारतीय युजर्ससाठी कॅनव्हा हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांचा सपोर्टही देतं. डिजिटल इंडियामध्ये प्रत्येक विद्यार्थी, क्रिएटर आणि छोट्या व्यावसायिकाने स्वतःच्या भाषेत कंटेंट बनवून पुढे जावं, याच उद्देशाने ही ऑफर आणल्याचं रिलायन्स जिओने सांगितलं आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
BigFlix: भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता OTT प्लॅटफॉर्म! तुम्हाला माहितीये का ही गोष्ट?
Recommended image2
Mahindra XUV 3XO CNG: महिंद्रा XUV 3XO मध्ये होणार मोठा बदल?
Recommended image3
Home Loan EMI: ईएमआय वाढवायचा की लोनचा कालावधी? RBI च्या निर्णयानंतर तुमचे लाखो रुपये कसे वाचतील?
Recommended image4
Bajaj Pulsar RS200: टेस्टिंगमध्ये दिसली नवी पल्सर, USD फोर्क्स आणि TFT डिस्प्लेसह होणार लाँच
Related Stories
Recommended image1
UPI Transaction Fee : यूपीआय व्यवहारांवरील शुल्कावर आरबीआयचं स्पष्टीकरण, 'डिजिटल पेमेंट मजबूत करण्यासाठी पाऊल'
Recommended image2
Smartwatch : तुमच्या स्मार्टवॉचमागे हिरवा लाईट का लागतो? स्टाईल नाही, हे आहे खरं कारण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved