सार
बहुतेक बँका रेकरिंग डिपॉझिटवर चांगले व्याज देतात.
रेकरिंग डिपॉझिट हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून, कमी रकमेतही रेकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करता येते. यासोबतच चांगले व्याज मिळते हे रेकरिंग डिपॉझिटचे वैशिष्ट्य आहे. बहुतेक बँका रेकरिंग डिपॉझिटवर चांगले व्याज देतात. देशातील प्रमुख बँकांचे रेकरिंग डिपॉझिट व्याजदर पाहूया.
हर घर लक्षपती आरडी
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची रेकरिंग डिपॉझिट योजना म्हणजे हर घर लक्षपती आरडी. तीन वर्षे, चार वर्षे अशा कालावधीच्या रेकरिंग डिपॉझिटवर एसबीआय ६.७५% व्याज देते. ५ ते १० वर्षे कालावधीच्या रेकरिंग डिपॉझिटवर साडेसहा टक्के व्याज मिळते.
एचडीएफसी बँक
रेकरिंग डिपॉझिटवर साव्वाचार टक्क्यांपासून ७.२५ टक्के पर्यंत व्याज एचडीएफसी बँक देते. सहा महिने कालावधीच्या आरडीवर साव्वाचार टक्के व्याज आहे. दोन वर्षांपासून १२० महिन्यांपर्यंतच्या कालावधीच्या रेकरिंग डिपॉझिटवर सात टक्के व्याज मिळते.
आयसीआयसीआय बँक आरडी
४.७५% ते ७.२५% पर्यंत व्याज आयसीआयसीआय बँकेच्या आरडीवर मिळते. सहा महिने कालावधीच्या रेकरिंग डिपॉझिटवर ४.७५ टक्के आणि एक वर्ष कालावधीच्या आरडीवर ६.७ टक्के व्याज आहे. १५ महिन्यांपासून २४ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ७.२५ टक्के व्याज आहे. २७ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी सात टक्के व्याज मिळते.
येस बँक आरडी
विविध कालावधीच्या रेकरिंग डिपॉझिटवर ६.१% ते ७.७ टक्के पर्यंत व्याज येस बँक देते. सहा महिने कालावधीच्या गुंतवणुकीवर ६.१० टक्के व्याज आणि १२ महिन्यांपासून ६० महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ७.२५ टक्के व्याज आहे.