MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Banking Jobs : भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी संधी; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज करण्याची शेवटची तारीख

Banking Jobs : भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी संधी; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज करण्याची शेवटची तारीख

सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. अशा स्थितीत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. बँकेच्या नोकरीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत ही संधी उपलब्ध झाली आहे.  

1 Min read
Author : Marathi Desk 3
Published : Dec 20 2025, 04:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
आरबीआय जॉब्स
Image Credit : Gemini AI

आरबीआय जॉब्स -

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2026 वर्षासाठी नवीन नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये RBISB/DA/04/2025-26 अंतर्गत एकूण 93 इंजिनिअर आणि तज्ज्ञांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

27
RBI मध्ये भरण्यात येणारी पदे -
Image Credit : Getty

RBI मध्ये भरण्यात येणारी पदे -

या भरतीमध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट, AI/ML स्पेशलिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर अशा विविध ग्रेड ‘C’, ‘D’, ‘E’ स्तरावरील पदांचा समावेश आहे. तसेच यासाठी कामाचे ठिकाण मुंबई असेल.

37
RBI मध्ये नोकरीसाठी पात्रता -
Image Credit : gemini

RBI मध्ये नोकरीसाठी पात्रता -

यासाठी BE/B.Tech/M.Tech/MCA/MSc/MBA/CA/ICWA पदवी आवश्यक. तसेच संबंधित क्षेत्रात 3 ते 10 वर्षांचा अनुभव हवा आहे. CISSP, CISA, PMP, AI/ML सारखी व्यावसायिक प्रमाणपत्रे असल्यास प्राधान्य दिले जाईल.

47
वयोमर्यादा
Image Credit : Getty

वयोमर्यादा

वयोमर्यादा 6 जानेवारी 2026 रोजी किमान 21 ते 40 वर्षे आहे. काही वरिष्ठ पदांसाठी कमाल वयोमर्याda 45 किंवा 62 वर्षांपर्यंत आहे. यामध्ये SC/ST, OBC, दिव्यांगांना नियमांनुसार वयात सवलत आहे.

57
पगार किती -
Image Credit : Getty

पगार किती -

पगार : ग्रेड ‘C’ पदांसाठी वार्षिक ₹3.10 लाख, ग्रेड ‘D’ साठी ₹4.30 लाख आणि ग्रेड ‘E’ साठी ₹4.80 लाखांपर्यंत CTC दिला जाईल. अनुभवी तज्ज्ञांसाठी हा एक आकर्षक पगार आहे.

67
निवड प्रक्रिया -
Image Credit : Getty

निवड प्रक्रिया -

निवड प्रक्रिया प्राथमिक छाननी, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे होईल. अर्ज शुल्क SC/ST/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांसाठी 100 रुपये आणि इतरांसाठी 600 रुपये आहे.

77
अर्ज करण्याची पद्धत -
Image Credit : Getty

अर्ज करण्याची पद्धत -

पात्र उमेदवार हे 06.01.2026 पर्यंत RBI च्या अधिकृत वेबसाइटhttps://opportunities.rbi.org.in/वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तरुणांसाठी नोकरी ही एक चांगली संधी असल्याने त्यांना अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

About the Author

MD
Marathi Desk 3
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Nissan Magnite: निसानच्या एकमेव आशेला झालंय काय? विक्रीत घट, जाणून घ्या कारणं
Recommended image2
Hybrid SUVs: भारतात लवकरच दाखल होणार चार नव्या दमदार गाड्या, पाहा लिस्ट
Recommended image3
Kia Carens Clavis EV : किया डीलरशिप्सनी 'क्लॅव्हिस दिन' साजरा केला
Recommended image4
नाजूक सोन्याची अंगठी दिसेल सुंदर, हातात घातल्यावर येईल युनिक लूक
Recommended image5
अनेक EPF खाती एका UAN अंतर्गत कशी विलीन कराल? जाणून घ्या सोपी ऑनलाइन प्रक्रिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved