MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • कर्ज स्वस्त होणार की महाग? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतले ५ मोठे निर्णय; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

कर्ज स्वस्त होणार की महाग? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतले ५ मोठे निर्णय; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

RBI Monetary Policy 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मॉनेटरी पॉलिसी बैठकीत रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवला, ज्यामुळे कर्जाचा EMI तूर्तास वाढणार नाही. एल निनोमुळे भविष्यात महागाई वाढण्याचा धोका वर्तवला, चालू वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज ६.९% ठेवलाय.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 08 2026, 03:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
कर्ज स्वस्त होणार की महाग? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतले ५ मोठे निर्णय
Image Credit : Social Media

कर्ज स्वस्त होणार की महाग? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतले ५ मोठे निर्णय

RBI Monetary Policy 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) तीन दिवसांची महत्त्वाची बैठक आज ८ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम तुमच्या होम लोन, कार लोन आणि बचतीवर होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
१. तुमचा EMI बदलणार का? (रेपो रेट स्थिर)
Image Credit : Asianet News

१. तुमचा EMI बदलणार का? (रेपो रेट स्थिर)

आरबीआयने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवला आहे. सलग दुसऱ्यांदा व्याजात कोणताही बदल झालेला नाही.

परिणाम: तुमचा बँक हप्ता (EMI) सध्या तरी वाढणार नाही. मात्र, डिसेंबरमध्ये झालेली कपात पाहता, बँका येणाऱ्या काळात व्याजदर थोडे कमी करण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
PM Kisan Yojana: पीएम किसानच्या नियमात मोठा बदल; महाराष्ट्रासह 'या' १४ राज्यांतील शेतकऱ्यांना आता 'हे' कार्ड बंधनकारक!
Related image2
या देशात मिळत कॉइनच्या किंमतीला पेट्रोल, कुठं आहे हा देश?
37
२. महागाईचा नवा अंदाज (CPI Inflation)
Image Credit : Social Media

२. महागाईचा नवा अंदाज (CPI Inflation)

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महागाईचा दर ४.६% राहण्याचा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे. विशेष म्हणजे प्रथमच 'कोअर महागाई'चा अंदाज ४.४% इतका जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे येत्या काळात वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतील अशी आशा आहे. 

47
३. 'एल निनो'चा धोक्याचा इशारा!
Image Credit : Asianet News

३. 'एल निनो'चा धोक्याचा इशारा!

आरबीआयने एका संकटाची जाणीव करून दिली आहे, ते म्हणजे 'एल निनो'. यामुळे पावसावर परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन घटू शकते. जर पाऊस कमी झाला, तर अन्नधान्याच्या किमती वाढून सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडू शकते. 

57
४. देशाची अर्थव्यवस्था किती वेगाने धावणार? (GDP)
Image Credit : Social Media

४. देशाची अर्थव्यवस्था किती वेगाने धावणार? (GDP)

चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP ६.९% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी (७.६%) च्या तुलनेत हा वेग थोडा कमी असला, तरी जागतिक मंदीच्या तुलनेत भारत एक 'ब्राइट स्पॉट' आहे.

Q1: ६.८% | Q2: ६.७% | Q3: ७% | Q4: ७.२% 

67
५. विदेशी चलन साठ्यात ऐतिहासिक उसळी
Image Credit : X

५. विदेशी चलन साठ्यात ऐतिहासिक उसळी

भारताची आर्थिक ताकद वाढत असून देशाचा विदेशी चलन साठा ६९७.१० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारताकडे ११ महिने पुरेल इतका आयात साठा असून, यामुळे रुपयाला मजबूती मिळणार आहे. 

77
तज्ज्ञांचे मत काय?
Image Credit : X

तज्ज्ञांचे मत काय?

आरबीआयने सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. महागाई नियंत्रणात येत असली तरी हवामानाचा धोका पाहता व्याजदर कपातीसाठी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

तुमचा EMI सध्या वाढणार नाही ही आनंदाची बातमी आहे, पण महागाई वाढू नये यासाठी पावसावर सर्वांची नजर असेल!

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hyundai Grand i10 Nios Offers: ह्युंदाईच्या या लोकप्रिय कारवर मिळतायत बंपर ऑफर्स!
Recommended image2
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI Repo Rate Hike : आरबीआयने रेपो रेट वाढवला, 20 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?
Recommended image4
Reliance Jio Smart Shop: रिलायन्स जिओची नवी AI सिस्टीम, आता ऑफलाईन दुकानदारांचाही होणार फायदा
Recommended image5
SIP Investment : तुमच्या पगारानुसार दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी? समजून घ्या सोपे गणित
Related Stories
Recommended image1
PM Kisan Yojana: पीएम किसानच्या नियमात मोठा बदल; महाराष्ट्रासह 'या' १४ राज्यांतील शेतकऱ्यांना आता 'हे' कार्ड बंधनकारक!
Recommended image2
या देशात मिळत कॉइनच्या किंमतीला पेट्रोल, कुठं आहे हा देश?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved