- Home
- Utility News
- Change Your Budgeting Rule Today : बजेट बनवण्याची पद्धत आजच बदला; हा 1 नियम आर्थिक स्थिती बदलून टाकेल
Change Your Budgeting Rule Today : बजेट बनवण्याची पद्धत आजच बदला; हा 1 नियम आर्थिक स्थिती बदलून टाकेल
पगार आल्यावर आधी खर्च आणि नंतर बचत, ही जुनी सवय आता सोडून द्या! 'आधी गुंतवणूक, नंतर खर्च' हा सोपा नियम तुमच्या बजेटमध्ये आणा. चक्रवाढ व्याजाच्या जादूने तुम्हीही करोडपती होऊ शकता.

पगारातून पहिली गुंतवणूक
जगातील बहुतांश करोडपती हे केवळ बिझनेसमुळे नाही, तर योग्य गुंतवणुकीमुळे श्रीमंत झाले आहेत. 'पगार आल्यावर आधी खर्च आणि मग बचत' ही सवय सोडा. 'पगारातील एक हिस्सा आधी गुंतवा आणि उरलेल्या पैशांतून बजेट चालवा', हा एकच नियम तुमची आर्थिक स्थिती लगेच बदलू शकतो.

पगार वापरण्याची पद्धत बदला!
आपल्यापैकी बहुतांश लोक पगार आल्यावर आधी घरभाडे, किराणा आणि मनोरंजनावर खर्च करतात. शेवटी पैसे उरले तरच बचत करतात, जी पूर्णपणे चुकीची पद्धत आहे.
समजा तुमचा महिन्याचा पगार ३०,००० रुपये आहे. त्यातील किमान २० टक्के म्हणजे ६,००० रुपये आधी गुंतवणुकीसाठी बाजूला काढा. उरलेले पैसेच इतर खर्चासाठी वापरा. सुरुवातीला हे थोडे कठीण वाटेल, पण ही सवय भविष्यात तुम्हाला सहज श्रीमंत करेल.
चक्रवाढ व्याजाची (Power of Compounding) जादू
थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणीप्रमाणे दरमहा छोटी रक्कम गुंतवूनही मोठी संपत्ती उभी राहते.
उदाहरणादाखल, एका ३० वर्षांच्या व्यक्तीने दरमहा ३,००० रुपयांची गुंतवणूक सुरू केली. वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत (सलग ३० वर्षे) त्याने एकूण १०.८० लाख रुपये गुंतवले. म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) सरासरी १२% परतावा गृहीत धरला, तर ही रक्कम तब्बल ९७ लाख रुपये होते!
हे ९७ लाख रुपये म्हातारपणी १०% व्याजाच्या फिक्स डिपॉझिटमध्ये (FD) ठेवले, तर वर्षाला ९.७ लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा सुमारे ८०,८३० रुपये घरबसल्या मिळतील. चक्रवाढ व्याजामुळे मुद्दलापेक्षा व्याज अनेक पटींनी वाढते.
म्युच्युअल फंड आणि ध्येयावर आधारित गुंतवणूक
वर आपण फक्त १२% परतावा गृहीत धरला आहे. पण अनेक चांगल्या म्युच्युअल फंड्सनी दीर्घ मुदतीत १५% किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे. अशा फंडमध्ये पैसे गुंतवल्यास ३० वर्षांनंतर ही रक्कम २ कोटी रुपयांच्या पुढे जाईल.
अनेक लोक तक्रार करतात की त्यांनी वर्षे गुंतवणूक केली तरी करोडपती झाले नाहीत. यामागचे मुख्य कारण म्हणजे ते मध्येच छोट्या गरजांसाठी पूर्ण पैसे काढून घेतात आणि गुंतवणूक थांबवतात.
यशाचे सुवर्ण नियम
- ध्येय निश्चिती: तुमची प्रत्येक गुंतवणूक एखाद्या ध्येयाशी (मुलांचे शिक्षण, लग्न, घर किंवा रिटायरमेंट) जोडलेली असावी. ध्येय स्पष्ट असल्यास तुम्ही मध्येच पैसे काढणे टाळाल.
- संयम महत्त्वाचा: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये अल्पवयीन चढ-उतारांना घाबरून बाहेर पडू नका. दीर्घकाळ गुंतवणूक सुरू ठेवल्यासच संपत्ती वाढते.
आजच तुमचे बजेट बदलून टाका आणि पहिला खर्च गुंतवणुकीकडे वळवा. तुमचे भविष्य नक्कीच सुरक्षित होईल.
महागाईनुसार गुंतवणूक वाढवा
दरवर्षी जसा तुमचा पगार वाढतो, तशीच तुमची बचत आणि गुंतवणुकीची रक्कमही किमान १०% ते १५% ने वाढवण्याची सवय ठेवा.
सबस्क्रिप्शनचा खर्च कमी करा
ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्स, जिम मेंबरशिप आणि न वापरल्या जाणाऱ्या मासिक सबस्क्रिप्शनची (Subscriptions) वेळोवेळी तपासणी करा. अनावश्यक सेवा रद्द करून तुम्ही बरीच रक्कम वाचवू शकता.
'२४ तासांचा' नियम
महागड्या वस्तू किंवा अचानक ऑनलाइन शॉपिंग करण्याची इच्छा झाल्यास, लगेच खरेदी करणे टाळा आणि २४ तास विचार करा. एक दिवसानंतर तुम्हाला समजेल की ती वस्तू खरंच गरजेची आहे की नाही.
ऑटोमेटेड सेव्हिंग (Automated Savings):
पगार जमा होताच तुमच्या बँक खात्यातून ठराविक रक्कम थेट बचत किंवा म्युच्युअल फंड खात्यात (Auto-debit) जमा होण्याची सुविधा चालू करा. यामुळे खर्च झाल्यावर उरलेले गुंतवू, हा विचारच संपून जाईल.
५०/३०/२० चा नियम
तुमचे मासिक उत्पन्न तीन भागांत विभागून घ्या. ५०% पैसा अत्यावश्यक गरजांसाठी (भाडे, किराणा), ३०% पैसा छंदांसाठी (मनोरंजन, शॉपिंग) आणि उरलेले २०% पैसा सक्तीच्या बचत व गुंतवणुकीसाठी वेगळा काढा.

