- Home
- Utility News
- Cheapest Automatic Cars : ट्रॅफिकमध्ये क्लच दाबून पाय दुखतोय? 5 लाखांत आणा ऑटोमॅटिक कार
Cheapest Automatic Cars : ट्रॅफिकमध्ये क्लच दाबून पाय दुखतोय? 5 लाखांत आणा ऑटोमॅटिक कार
ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबून कंटाळला आहात? ५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक कार शोधत आहात? दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू सारख्या शहरांमधील स्वस्त AMT कार्सच्या ऑन-रोड किमती आणि फीचर्स….

भारतातील सर्वात स्वस्त आणि उत्तम ऑटोमॅटिक कार्स
सणासुदीचा काळ म्हणजे नवीन वस्तू घरी आणण्याची उत्तम वेळ. या सीझनमध्ये तुम्ही नवीन ऑटोमॅटिक कार घेण्याचा विचार करत आहात का? शहरातील ट्रॅफिकच्या त्रासाशिवाय आरामदायी प्रवासासाठी ऑटोमॅटिक कार हा एक उत्तम पर्याय आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि कोची यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मिळणाऱ्या बजेटमधील ऑटोमॅटिक कार्सची माहिती….

वेगवेगळ्या शहरांमध्ये काय आहेत किमती?
शहरांनुसार पाहिल्यास, देशाची राजधानी दिल्लीत सध्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक मॉडेल मारुती ऑल्टो K10 VXi (O) AMT आहे. याची ऑन-रोड किंमत अंदाजे ₹५.४७ लाख आहे. हीच कार जर तुम्ही कोचीमध्ये घेतली तर तिची किंमत सुमारे ₹५.६५ लाख असेल.
चेन्नईमध्ये रेनॉल्ट क्विड इव्होल्यूशन AMT ची किंमत ₹५.८५ लाख आहे. मुंबईत मारुती एस-प्रेसो AMT ची ऑन-रोड किंमत ₹५.७४ लाखांपासून सुरू होते. बंगळुरूमध्ये टाटा टियागो प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट ₹७.४५ लाखांपासून मिळते. ह्युंदाई एक्स्टर AMT ची किंमत थोडी जास्त असून मुंबईत त्याची सुरुवात ₹८.२२ लाखांपासून होते.
मारुती ऑल्टो K10 VXi (O) AMT
मारुती ऑल्टो K10 ही भारतातील सर्वात लोकप्रिय बजेट ऑटोमॅटिक हॅचबॅक आहे. तिचे फीचर्स पाहूया.
• इंजिन: ९९८ सीसी K10C पेट्रोल इंजिन
• पॉवर आणि टॉर्क: ६७ bhp पॉवर / ८९ Nm टॉर्क
• मायलेज: अंदाजे २४.९ किमी/लिटर
• प्रमुख फीचर्स: ड्युअल एअरबॅग, EBD सह ABS, रिअर पार्किंग सेन्सर, पॉवर स्टिअरिंग, फ्रंट पॉवर विंडोज.
• वैशिष्ट्य: अतिशय कमी देखभाल खर्च, उत्तम मायलेज, शहरात चालवण्यासाठी सोपी.
• ऑन-रोड सुरुवातीची किंमत: ₹५.४७ लाख
मारुती एस-प्रेसो VXi (O) AMT
मारुती एस-प्रेसो VXi ही एक मायक्रो हॅचबॅक आहे, जिची डिझाईन SUV सारखी आहे आणि सीटिंग पोजिशन उंच आहे. तिचे फीचर्स पाहूया...
• इंजिन: ९९८ सीसी K10C पेट्रोल इंजिन
• पॉवर आणि टॉर्क: ६७ bhp पॉवर / ८९ Nm टॉर्क
• मायलेज: सुमारे २५.३ किमी/लिटर
• प्रमुख फीचर्स: हिल होल्ड असिस्ट, स्मार्टप्ले डॉक, पॉवर स्टिअरिंग, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम.
• वैशिष्ट्य: उत्तम ग्राऊंड क्लिअरन्स, केबिनमध्ये जास्त हेडरूम, सेगमेंटमधील सर्वोत्तम मायलेज.
• ऑन-रोड सुरुवातीची किंमत: ₹५.७४ ते ६.३२ लाख
रेनॉल्ट क्विड इव्होल्यूशन AMT
रेनॉल्ट क्विड इव्होल्यूशन AMT आपल्या स्पोर्टी लूक आणि कॉम्पॅक्ट साईझमुळे तरुणांना आकर्षित करते.
• इंजिन: ९९९ सीसी ३-सिलिंडर पेट्रोल इंजिन
• पॉवर आणि टॉर्क: ६७ bhp पॉवर / ९१ Nm टॉर्क
• मायलेज: अंदाजे २१.५ किमी - २२.३ किमी प्रति लिटर
• प्रमुख फीचर्स: रोटरी डायल गिअर शिफ्टर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम.
• वैशिष्ट्य: आकर्षक डिझाईन, डिजिटल फीचर्स, सोप्या ड्रायव्हिंगसाठी रोटरी AMT डायल.
• ऑन-रोड सुरुवातीची किंमत: ₹५.८५ लाख
टाटा टियागो प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक
सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्यांसाठी टाटा टियागो हा एक उत्तम पर्याय आहे. तिचे फीचर्स पाहूया...
• इंजिन: ११९९ सीसी रेवोट्रॉन १.२ लिटर पेट्रोल इंजिन
• पॉवर आणि टॉर्क: ८५ bhp पॉवर / ११३ Nm टॉर्क
• मायलेज: अंदाजे २०.०९ किमी/लिटर
• सुरक्षा रेटिंग: या कारला ग्लोबल NCAP कडून ४-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
• प्रमुख फीचर्स: ड्युअल एअरबॅग, EBD सह ABS, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, पॉवर विंडोज.
• वैशिष्ट्य: इतर कार्सच्या तुलनेत मजबूत बॉडी स्ट्रक्चर, पॉवरफुल १.२ लिटर इंजिन, ४-स्टार सेफ्टी.
• ऑन-रोड सुरुवातीची किंमत: ₹७.४५ लाख

