पुणे विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १३८ शहर समन्वयक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. BE/B.Tech, B.Arch, B.Planning, B.Sc. पदवीधरांसाठी ही संधी असून, वयोमर्यादा ३५ वर्षांपर्यंत आहे. मासिक मानधन ₹45,000 असेल.

पुणे : विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पुणे विभागातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये शहर समन्वयक (कंत्राटी) पदासाठी मोटा भरती जाहीर झाला आहे. या भव्य भरती अंतर्गत ७४ + ६४ = १३८ रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत आणि ₹45,000 मासिक मानधनासह ही एक सुवर्णसंधी आहे.

पदाचे महत्त्व व जबाबदाऱ्या

शहर समन्वयक हे स्थानिक स्वच्छता व विकास योजनेचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगरपरिषद व पंचायत स्तरावर स्वच्छता सुनिश्चित करण्यास हातभार लागणार आहे.

पात्रता व वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता:

BE/ B.Tech (कोणतीही शाखा) किंवा

B.Arch., B.Planning, B.Sc. (कोणतीही शाखा)

वयोमर्यादा:

उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख ०२ जुलै २०२५

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख ०८ जुलै २०२५

टीप: अर्ज करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्या.

हे पद कोणासाठी?

तुमच्यात प्रशासकीय व संस्थात्मक समन्वयाचे गुण असतील तर

तुम्हाला स्थानिक विकास, स्वच्छता व सार्वजनिक जागांमध्ये योगदान द्यायचं असेल तर

आणि ₹45,000 मासिक उत्पन्न आणि विकासकारी भूमिकेत स्वारस्य असल्यास 

ही पात्रता, तसेच निवडणूक प्रक्रिया तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.