MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Post Office Scheme : ५ लाख रुपये गुंतवल्यास कशात जास्त फायदा? कोणती योजना बेस्ट?

Post Office Scheme : ५ लाख रुपये गुंतवल्यास कशात जास्त फायदा? कोणती योजना बेस्ट?

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) या योजनांमध्ये ५ लाख रुपये गुंतवल्यास मिळणारा परतावा आणि टॅक्स बेनिफिट्सबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 12 2026, 08:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पोस्ट ऑफिस PPF vs NSC ची तुलना
Image Credit : X

पोस्ट ऑफिस PPF vs NSC ची तुलना

कष्टानं कमावलेला पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच तुमची मूळ रक्कम १००% सुरक्षित राहणंही महत्त्वाचं आहे. नफा किती मिळतो यापेक्षा पैशांची सुरक्षा जास्त गरजेची असते. त्यादृष्टीने विचार केल्यास, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये तुम्ही नक्कीच गुंतवणूक करू शकता, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावाही मिळेल. विशेषतः पोस्ट ऑफिसच्या PPF आणि NSC या योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF (Public Provident Fund) आणि नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट म्हणजेच NSC (National Savings Certificate) या दोन योजना अनेक लोकांची पहिली पसंती असतात. जर तुमच्याकडे ५ लाख रुपये असतील, तर या दोन्हीपैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणं योग्य राहील? कशात जास्त फायदा मिळेल? आणि तुमच्यासाठी कोणती योजना बेस्ट आहे? हे आपण एका सोप्या कॅल्क्युलेशनद्वारे समजून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
PPF आणि NSC योजना समजून घ्या
Image Credit : X

PPF आणि NSC योजना समजून घ्या

NSC योजना - या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडे असलेली सगळी रक्कम तुम्ही एकाच वेळी गुंतवू शकता.

PPF योजना - या योजनेत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयेच जमा करता येतात. त्यामुळे ५ लाख रुपये तुम्ही PPF मध्ये एकाच वेळी गुंतवू शकत नाही. ही रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्याने गुंतवावी लागेल.

५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन:

१. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC)

गुंतवणुकीची रक्कम - ५,००,००० रुपये

गुंतवणुकीचा कालावधी - ५ वर्षे

व्याजदर - वार्षिक ७.७%

५ वर्षांसाठी मिळणारे व्याज - २,२४,९७४ रुपये

एकूण मॅच्युरिटी रक्कम - ७,२४,९७४ रुपये

Related Articles

Related image1
Diwali Bonus Investment : दिवाळीच्या बोनसचे पैसे या पद्धतीने गुंतवा, अडीअडचणींना येतील कामी
Related image2
Saving Investment Tips : १ कोटी कसे जमा कराल? दर महिन्याच्या गुंतवणुकीतून तयार होईल फंड
34
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
Image Credit : X

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)

PPF योजनेत ५ लाख रुपये गुंतवायचे असतील तर ते टप्प्याटप्प्यानेच गुंतवावे लागतील. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयेच गुंतवता येत असल्यामुळे, तुम्ही ५ लाख रुपये दरवर्षी खालीलप्रमाणे विभागून गुंतवू शकता:

पहिले वर्ष - १,००,००० रुपये

दुसरे वर्ष - १,००,००० रुपये

तिसरे वर्ष - १,००,००० रुपये

चौथे वर्ष - १,००,००० रुपये

पाचवे वर्ष - १,००,००० रुपये

PPF च्या नियमांनुसार दरवर्षी १ लाख रुपये याप्रमाणे ५ वर्षांत ५ लाख रुपये गुंतवल्यास, पाचव्या वर्षाच्या शेवटी ७.१% व्याजदराने तुम्हाला एकूण १,१७,१३४ रुपये व्याज मिळेल. यानुसार ५ व्या वर्षी मिळणारी एकूण मॅच्युरिटी रक्कम ६,१७,१३४ रुपये असेल.

मात्र, PPF ही काही ५ वर्षांची योजना नाही. तिचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असतो. हवं तर तुम्ही ७ व्या वर्षी थोडे पैसे काढू शकता. जर तुम्ही ५ लाख रुपये दरवर्षी १.५ लाख याप्रमाणे गुंतवले, तर १५ व्या वर्षी तुम्हाला ७,९१,३३८ रुपये व्याज मिळेल. आणि तुमची एकूण मॅच्युरिटी रक्कम १२,९१,३३८ रुपये होईल.

44
टॅक्स बेनिफिट्स (Tax Benefits)
Image Credit : X

टॅक्स बेनिफिट्स (Tax Benefits)

PPF योजना - पूर्णपणे टॅक्स फ्री परतावा देणाऱ्या उत्तम योजनांपैकी PPF ही एक योजना आहे. सेक्शन 80C अंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर टॅक्स सवलत मिळते, मिळणाऱ्या व्याजावरही टॅक्स लागत नाही. तसेच १५ वर्षांनंतर मिळणाऱ्या मॅच्युरिटी रकमेवरही कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.

NSC योजना - यामध्ये १.५ लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळवता येते. पहिल्या चार वर्षांसाठी मिळणारे व्याज पुन्हा गुंतवले जाते असे मानले जाते, त्यामुळे त्यावरही टॅक्स सवलत मिळते. परंतु, ५ व्या वर्षी मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारे एकूण व्याज हे तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार (Income Tax Slab) टॅक्सेबल असते. जर तुमच्याकडे ५ लाख रुपये असतील आणि ते ५ वर्षांत चांगल्या व्याजासह परत हवे असतील, तर तुमच्यासाठी NSC योजना हा एक उत्तम पर्याय आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Royal Enfield Himalayan 750 : रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ची लॉन्च डेट कन्फर्म, इंजिन आणि फीचर्स पहा
Recommended image2
Smartphone Battery Test : आयफोन 18 प्रो मॅक्सची 31 स्मार्टफोन्सवर मात, बॅटरी टेस्टमध्ये मारली बाजी; पाहा रँकिंग
Recommended image3
7 Seater Cars : भारतातील बजेटमधील 7-सीटर फॅमिली कार्स
Recommended image4
Bike Tyre Care : हिवाळ्यात बाईकच्या टायरची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या या खास टिप्स
Recommended image5
Bike Comparison : 2026 बजाज पल्सर 125, VS होंडा CB125 हॉर्नेट; कोणती बाईक ठरेल बेस्ट?
Related Stories
Recommended image1
Diwali Bonus Investment : दिवाळीच्या बोनसचे पैसे या पद्धतीने गुंतवा, अडीअडचणींना येतील कामी
Recommended image2
Saving Investment Tips : १ कोटी कसे जमा कराल? दर महिन्याच्या गुंतवणुकीतून तयार होईल फंड
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved