CNET ने नुकत्याच केलेल्या स्मार्टफोन बॅटरी टेस्टमध्ये ॲपलच्या आयफोन 18 प्रो मॅक्सने 32 स्मार्टफोन्सना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. बॅटरी क्षमता इतर काही फोन्सपेक्षा कमी असली तरी, ॲपलच्या जबरदस्त सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनमुळे हा फोन टॉपवर राहिला. इतर आयफोन मॉडेल्सनीही या यादीत चांगली कामगिरी केली आहे.

मुंबई : CNET ने नुकत्याच केलेल्या एका मोठ्या स्मार्टफोन बॅटरी टेस्टमध्ये अॅपलचा नवीन आयफोन 18 प्रो मॅक्स टॉपवर राहिला आहे. या टेस्टमध्ये एकूण 32 स्मार्टफोन्सची चाचणी करण्यात आली. यात आयफोनने सॅमसंग, गुगल, वनप्लस आणि मोटोरोला यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या प्रीमियम अँडरॉईड फोन्सना मागे टाकले आहे.

या निकालांवरून ॲपलचे बॅटरी ऑप्टिमायझेशन किती भारी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अँड्रॉइड फोन्समध्ये जास्त क्षमतेची बॅटरी असूनही आयफोन 18 प्रो मॅक्सने सर्वांना मागे टाकले. या टेस्टमध्ये आयफोन 17 आणि आयफोन 18 प्रो हे मॉडेल्सही टॉप रँकिंगमध्ये आहेत.

आयफोन 18 प्रो मॅक्स पहिल्या क्रमांकावर

CNET च्या या बॅटरी टेस्टमध्ये आयफोन 18 प्रो मॅक्सने ओव्हरऑल पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर आयफोन 17 आणि आयफोन 18 प्रो हे मोटोरोला रेझर (2026) आणि वनप्लस 15 सोबत आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 8 राहिला. तर चौथ्या क्रमांकावर ॲपलचा आयफोन 17e, आयफोन ड्युओ आणि मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026) आहेत. सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा पाचव्या क्रमांकावर आहे.

रँकिंगमधील टॉप स्मार्टफोन्स -

पहिला क्रमांक: आयफोन 18 प्रो मॅक्स

दुसरा क्रमांक (टाय): ॲपल आयफोन 17, ॲपल आयफोन 18 प्रो, मोटोरोला रेझर (2026), वनप्लस 15

तिसरा क्रमांक: सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड8

चौथा क्रमांक (टाय): ॲपल आयफोन 17e, ॲपल आयफोन ड्युओ, मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026)

पाचवा क्रमांक: सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा

आयफोन 18 प्रो मॅक्सच्या eSIM व्हेरियंटमध्ये 5,567mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर आयफोन 18 प्रो मध्ये 4,288mAh आणि आयफोन 17 मध्ये 3,692mAh ची बॅटरी आहे.

CNET ने बॅटरी टेस्ट कशी केली?

CNET ने 32 स्मार्टफोन्सची वेगवेगळ्या पद्धतीने बॅटरी खपत तपासण्यासाठी दोन टेस्ट घेतल्या.

पहिल्या टेस्टमध्ये, सर्व फोन्सची ब्राइटनेस फुल ठेवून वायफायवर सलग तीन तास व्हिडिओ स्ट्रीम करण्यात आले. दुसरी टेस्ट 45 मिनिटांची होती, ज्यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात आला.

दोन्ही टेस्टसाठी सुरुवातीला सर्व फोन्स 100% चार्ज होते. टेस्ट पूर्ण झाल्यावर CNET ने शिल्लक बॅटरीची नोंद केली आणि त्यावरून ओव्हरऑल रँकिंग ठरवले. दुसऱ्या टेस्टमध्ये (मिक्स्ड युज), आयफोन 18 प्रो मॅक्स आणि ॲपलचा फोल्डेबल आयफोन ड्युओ या दोन्ही फोन्समध्ये 99% बॅटरी शिल्लक राहिली आणि ते पहिल्या क्रमांकावर राहिले. तर पहिल्या टेस्टमध्ये (व्हिडिओ स्ट्रीमिंग), छोट्या आयफोन 18 प्रो ने बाजी मारली. तीन तासांच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगनंतरही त्यात 94% बॅटरी शिल्लक होती.

ब्रँड्समध्ये ॲपल सर्वात पुढे

CNET च्या या रँकिंगमध्ये ओव्हरऑल ब्रँड म्हणूनही ॲपल पहिल्या क्रमांकावर आहे. सलग दुसऱ्या वर्षी ॲपलने हे स्थान कायम राखले आहे.

ॲपलनंतर दुसऱ्या क्रमांकावर वनप्लस आहे. त्याखालोखाल मोटोरोला, सॅमसंग आणि गुगलचा नंबर लागतो. या रँकिंगमध्ये अशाच कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता ज्यांचे एकापेक्षा जास्त फोन्स टेस्ट करण्यात आले.

पण या टेस्टच्या निकालांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, स्मार्टफोनच्या बॅटरी परफॉर्मन्समध्ये खूप मोठा बदल झालेला नाही. CNET च्या मते, 2026 मध्ये टेस्ट केलेल्या फोन्सचा बॅटरी परफॉर्मन्स 2025 आणि 2024 च्या फोन्ससारखाच आहे.

यावरून हेही स्पष्ट होते की, स्मार्टफोनची बॅटरी लाईफ फक्त बॅटरीच्या क्षमतेवर अवलंबून नसते. प्रोसेसरची कार्यक्षमता, डिस्प्ले टेक्नोलॉजी, सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन आणि बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटीज यांसारख्या अनेक गोष्टींचा बॅटरीवर परिणाम होतो.

CNET च्या या टेस्टमध्ये आयफोन 18 प्रो मॅक्स पहिल्या क्रमांकावर असला, तरी ही फक्त CNET ची टेस्ट प्रोसेस होती हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्यक्ष वापरात फोनची बॅटरी लाईफ तुमच्या वापराच्या पद्धतीवर, सेटिंग्सवर आणि नेटवर्कच्या परिस्थितीवर अवलंबून असते.