7 Seater Cars : भारतातील बजेटमधील 7-सीटर फॅमिली कार्स
भारतात उपलब्ध असलेल्या ७-सीटर कार्सबद्दल माहिती. यात मारुती अर्टिगा, महिंद्रा बोलेरो आणि रेनॉल्ट ट्रायबरसारख्या लोकप्रिय कार्सचे फीचर्स, मायलेज आणि सेफ्टीची सविस्तर माहिती….

Maruti Suzuki Ertiga
ही देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकली जाणारी ७-सीटर एमपीव्ही आहे. याचा लूक अतिशय प्रीमियम आहे, ज्यात 3D क्रोम ग्रिल आणि आकर्षक टेल लॅम्प्स आहेत. आरामदायक सीट्स आणि भरपूर लेगरूम असल्यामुळे प्रवाशांना ती खूप आवडते. यामध्ये ७-इंचाची स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल, रूफ-माउंटेड एसी व्हेंट्स आणि कूल्ड कप होल्डर्स यांसारखे प्रॅक्टिकल फीचर्स मिळतात. तिची एक्स-शोरूम किंमत ₹८.८५ लाखांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Ertiga
परफॉर्मन्सबाबत बोलायचे तर, अर्टिगामध्ये १.५-लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे जे १०३ पीएस पॉवर देते. यात ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड ऑटोमॅटिक आणि फॅक्टरी-फिटेड सीएनजीचे पर्याय आहेत. सेफ्टीसाठी यात ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि रियर पार्किंग सेन्सर्स आहेत. पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट २०.५१ किमी/लिटर तर सीएनजी व्हेरिएंट २६.११ किमी/किलो मायलेज देते.
2025 Mahindra Bolero
भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात ही कार खूप लोकप्रिय आहे. तिचा लूक पारंपारिक आणि मजबूत आहे, ज्यात मेटल बंपर आणि महिंद्राची सिग्नेचर ग्रिल आहे. आतील बाजू साधी पण खूप टिकाऊ आहे. डिजिटल क्लस्टर, पॉवर स्टिअरिंग, मॅन्युअल एसी, पॉवर विंडो आणि बेसिक ऑडिओ सिस्टम यांसारखे फीचर्स यात आहेत. लांबच्या प्रवासासाठी ७ सीट्सची सोय उत्तम आहे. एक्स-शोरूम किंमत ₹८.४९ लाखांपासून सुरू होते.
Mahindra Bolero
महिंद्रा बोलेरोमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, रियर पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमायंडरसारखे बेसिक सेफ्टी फीचर्स आहेत. यात १.५-लिटर एमहॉक७५ डिझेल इंजिन आहे जे ७५ बीएचपी पॉवर आणि २१० एनएम टॉर्क निर्माण करते. ही फक्त ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येते. मजबूत बिल्ड आणि मेटल बॉडी असूनही, ही एसयूव्ही सुमारे १६ किमी/लिटर (ARAI प्रमाणे) मायलेज देते.
2025 Renault Triber:
ही तिच्या कॉम्पॅक्ट साईज आणि उत्तम स्पेस मॅनेजमेंटसाठी ओळखली जाते. तिचे डिझाईन, मस्कुलर बॉडी क्लॅडिंग आणि रूफ रेल्स तिला एसयूव्हीसारखा लूक देतात. इंटिरिअरमध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि ७-सीटर लेआउट आहे. तिसऱ्या रांगेतील 'इझीफिक्स' सीट्स पूर्णपणे काढता येतात. यात ८-इंच टचस्क्रीन सिस्टम, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, मागचा एसी आणि ६-स्पीकर ऑडिओ सिस्टम आहे. एक्स-शोरूम किंमत ५,८०,८७५ रुपये आहे.
यात १.०-लिटर एनर्जी पेट्रोल इंजिन आहे जे ७२ पीएस पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क देते. ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह सीएनजीचाही पर्याय आहे. सेफ्टीमध्ये ग्लोबल एनसीएपीकडून ४-स्टार रेटिंग मिळाले आहे. ६ एअरबॅग्स, रियर पार्किंग सेन्सर आणि टीपीएमएस यांसारखे फीचर्स आहेत. कंपनीच्या मते ही कार १८.२ ते २० किमी/लिटर मायलेज देते.
2026 Nissan Gravite:
निसान ग्रॅव्हिट ही ७-सीटर कार सिग्नेचर ग्रिल आणि शार्प एलईडी हेडलॅम्प्ससह आधुनिक डिझाईनमध्ये येते. इंटिरिअरमध्ये प्रीमियम फिनिशिंगसह मॉड्युलर केबिन आहे. यात काढता येण्याजोग्या तिसऱ्या रांगेच्या सीट्स आहेत. ८-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे स्मार्ट फीचर्स यात मिळतात. एक्स-शोरूम किंमत ५,७३,४०० रुपयांपासून सुरू होते.

