- Home
- Utility News
- PM Kisan 21st Installment Date: पीएम किसानचा 21 वा हप्ता केव्हा मिळणार? 2000 रुपयांबाबत मोठी अपडेट जाहीर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
PM Kisan 21st Installment Date: पीएम किसानचा 21 वा हप्ता केव्हा मिळणार? 2000 रुपयांबाबत मोठी अपडेट जाहीर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
PM Kisan 21st Installment Date: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याद्वारे 18,000 कोटी रुपये वितरीत केले जाणार असून, लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शेतकरी वर्गाला सर्वाधिक उत्सुकता असलेल्या 21 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार, याबाबत अखेर तारीख निश्चित करण्यात आली आहे.
PM Kisan 21वा हप्ता, तारीख जाहीर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत एका वर्षात शेतकऱ्यांना 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यात आला होता.
21व्या हप्त्याद्वारे 18,000 कोटी रुपये वितरीत
PM Kisanच्या अधिकृत माहितीप्रमाणे, 21वा हप्ता जाहीर होताच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये थेट जमा केले जातील. याशिवाय, अलीकडील पुरपरिस्थितीचा विचार करून पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू–कश्मीर येथील शेतकऱ्यांना 21वा हप्ता आगाऊ दिला गेला आहे.
11 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटींचा लाभ
योजना सुरू झाल्यापासून
11 कोटी शेतकऱ्यांना फायदा
एकूण वितरित निधी: 3.70 लाख कोटी रुपये
प्रत्येक शेतकऱ्याला आतापर्यंत: 40,000 रुपये (20 हप्त्यांद्वारे)
हप्ते जारी करण्यामध्ये साधारणपणे किमान 4 महिन्यांचे अंतर ठेवले जाते.
ई-केवायसी आवश्यक! नाही तर 2,000 रुपये मिळणार नाहीत
21 वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे.
जे शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत, त्यांना रक्कम मिळणार नाही.
ई-केवायसी करण्याचे पर्याय
CSC सेंटरवर प्रत्यक्ष जाऊन
पीएम किसान वेबसाइटवर
OTP आधारित e-KYC
बायोमेट्रिक e-KYC
फेस ऑथेंटिकेशन e-KYC

