सार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. ईपीएफओमध्ये सेवानिवृत्तीनंतर काही फायदे मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. 

PF Bonus : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशभरातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. खरंतर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना बचतीचे काही प्लॅन उपलब्ध करून दिले जातात. यामुळे नोकरीनंतर कर्मचाऱ्याला दीर्घकाळासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते. 

पण काहीजणांना ईपीएफओच्या काही नियमांबद्दर माहिती नसते. त्यापैकीच एक म्हणजे लॉयल्टी-कम-लाइफ-बेनिफिट प्रोव्हिजन (loyalty-cum-life benefit). ईपीएफओ खातेदारांना लॉयल्टी-कम-लाइफ-बेनिफिटअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकते. केवळ एक अट पूर्ण करावी लागते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

लॉयल्टी-कम-लाइफ-बेनिफिटसाठी अट
सर्व पीएफ खातेधारकांना असा सल्ला दिला जातो की, त्यांनी नेहमीच एकच ईपीएफ खात्यात योगदान द्यावे. अशातच ग्राहकाने 20 वर्षांपर्यंत एकाच खात्यात योगदान दिल्यास त्यांना लॉयल्टी-कम-लाइफ-बेनिफिटचा फायदा मिळू शकतो. अशातच ईपीएफओ खातेधारकांना 50 हजार रुपयांपर्यंतचा बोनस दिला जातो. खरंतर, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डकडून(CBDT)लॉयल्टी-कम-लाइफ-बेनिफिट देण्याची सिफारीश केली होती.

कोणाला मिळतो किती लाभ
एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 5 हजार रुपये असल्यास त्याला 30 रुपयांचा फायदा मिळतो. याशिवाय ज्या व्यक्तीची सॅलरी 5001 रुपये ते 10 हजार रुपयांपर्यंत असल्यास त्याला 40 हजार रुपयांचा लाभ मिळतो. अशाप्रकारे ज्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास त्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो.

लॉयल्टी-कम-लाइफ-बेनिफिटचा फायदा अशावेळी मिळू शकतो ज्यावेळी तुम्ही नोकरी बदलल्यानंतरही एकच ईपीएफ खाते सुरू ठेवले जाते. सध्या पीएफ खाते ऑटोमॅटिक ट्रान्सफर केले जाते. सर्वाधिक महत्त्वाची बाब अशी की, नोकरी करताना पीएफ खात्यामधील रक्कम काढू नये असा सल्ला दिला जातो. अन्यथा इन्कम टॅक्ससह रियाटर्मेंट फंडलाही नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त पेन्शन बेनिफिट आणि लॉयल्टीचेही नुकसान होऊ शकते.

आणखी वाचा : 

मे महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या कोणत्या तारखेला असणार बंद

Aadhar Card ला असे लावा बायोमॅट्रिक लॉक, फसवणूकीच्या घटनांपासून रहाल दूर