इंस्टाग्राम रिल्सवर Views येत नाही? लक्षात ठेवा या सोप्या ट्रिक

| Published : May 03 2024, 06:30 AM IST / Updated: May 03 2024, 07:53 AM IST

Instagram logo

सार

इंस्टाग्राम रिल्स तयार करून बहुतांशजण प्रसिद्ध झाल्याचे आपण पाहतोय. खरंतर, इंस्टाग्रामवरील रिल्सला व्यूज किती मिळाले जातात यावरून तुम्ही कोणत्या स्तरापर्यंत पोहोचू शकता हे कळते. अशातच रिल्सला सर्वाधिक व्हूज मिळवण्यासाठी काय करावे? हे जाणून घेऊया…

Technology : सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 516.92 अब्ज युजर्सची संख्या आहे. यापैकी बहुतांशजण दररोज अनेक तास रिल्स पाहण्यात वेळ घालवतात. काही युजर्स रिल्स तयार करून सोशल मीडियावरील इंन्फ्ल्युएंसर होण्याचे स्वप्न पाहतात. अशातच सध्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून करियरची संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येतेय. 

पण काही क्रिएटर्सला इंस्टाग्रामचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा हे माहिती नसते. अशातच सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होण्यासाठी खूप उत्तम काम करूनही प्रसिद्धी मिळत नाही. यामागील कारण काय आणि इंस्टाग्रामवर रिल्सला सर्वाधिक व्हूज मिळवण्यासाठी काय करावे याबद्दलची सोपी ट्रिक जाणून घेऊया.

रिल्स तयार करण्याबद्दल महत्त्वाची बाब

इंस्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करूनही रिल्स व्हायरल होत नसल्यास काय करावे याबद्दलच्या टीप्स.

  • इंस्टाग्रामवर एखाद्या गोष्टीबद्दल रिल तयार करत असाल तर त्याबद्दल आधीच ठरवा.
  • इंस्टाग्रामवरील रिल्सचा आकार 9:16 ठेवा.
  • इंस्टाग्रामवरील रिल तुमची कमीतकमी 90 सेकंदाची असावी.
  • रिल्स तयार केल्यानंतर उत्तम पद्धतीने एडिंगही करा. जेणेकरून युजरला पाहताना मजा येईल.
  • रिल्स एडिट करताना कॉपी राइट गाणे, कॅमेरा फिल्टर अशा गोष्टींकडेही लक्ष द्या.

रिल्स अपलोड करण्याची योग्य पद्धत

इंस्टाग्रामवर रिल्स व्हायरल होण्यासाठी पुढील काही गोष्टी ठेवा.

  • रिल्स अपलोड करताना सर्वप्रथम पाहा युजर्स कोणत्या वेळेत इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह आहेत हे पाहा. सर्वसामान्यपणे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने युजर्स अ‍ॅक्टिव्ह असतात. या वेळात तुम्ही रिल्स अपलोड केल्यास नक्कीच व्हायरल होऊ शकतात.
  • रिल्स अपलोड करताना उत्तम कॅप्शन आणि हॅशटॅगचा वापर करा.
  • रिल्ससाठी एक कव्हर इमेजही लावा.
  • वरील काही गोष्टी लक्षात ठेवून रिल्स अपलोड केल्यास नक्कीच व्हूज वाढले जाऊ शकतात. पण रिल्स दररोज शेअर करणेही फार महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा : 

फक्त 11,499 रुपयांमध्ये रुपयांमध्ये घेऊ शकता Iphone 14

Aadhar Card ला असे लावा बायोमॅट्रिक लॉक, फसवणूकीच्या घटनांपासून रहाल दूर