सार
Aadhar Card भारतीय नागरिकाचे ओखळपत्र झाले आहे. पण अलीकडल्या काळात आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याची प्रकरणे वाढली जात आहेत. अशातच आधार कार्डला तुम्ही बायोमॅट्रिक लॉक लावू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.....
Aadhar Card Safety Tips : भारतातील नागरिकाची ओखळ म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. या आधार कार्डवर 12 अंकी एक क्रमांक असतो, जो कधीच बदलला जात नाही. शाळेत प्रवेश घ्यायचा असो किंवा शासकीय कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो. पण गेल्या काही काळापासून आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार दिवसागणिक वाढताना दिसून येत आहेत. यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया सविस्तर....
आधार कार्डच्या माध्यमातून अशी केली जाते फसवणूक
आधार कार्डच्या नावाखाली तुम्हाला फसवणूकदार व्यक्ती बँकेचा अधिकारी अथवा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून तुम्हाला फोन किंवा मेसेज करतो. मेसेजमध्ये असलेल्या अज्ञात लिंकच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. याशिवाय ईमेलच्या माध्यमातूनही नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे आधार कार्ड लिंक करण्याच्या नावाखालीही नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आधार कार्डसंदर्भातील माहिती एखाद्यासोबत शेअर करताना काळजी घ्यावी.
आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून असे राहा दूर
- आधार कार्डला बायोमॅट्रिक लॉक लावा.
- अज्ञात व्यक्तीसोबत आधार कार्डची माहिती शेअर करू नका.
- आधआर कार्डसोबत आपला मोबाइल क्रमांक अपडेट करा.
- एखाद्या डिवाइसवर आधार कार्डची डिजिटल कॉपी ठेवण्यापासून दूर राहा.
- एखाद्या कंप्युटरमध्ये आधार कार्डसंदर्भातील सर्व माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा.
आधार कार्ड बायोमॅट्रिकला असे लावा लॉक
आधार कार्ड बायोमॅट्रिक लॉक नागरिकांना आर्थिक फसवणूकीपासून दूर ठेवू शकते. आधार कार्ड लॉक करण्यासाठी तुम्हाला वर्च्युअल आयडीची गरज भासणार आहे. पण तुमच्याकडे वर्च्युअल आयडी नसल्यास तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरून तयार करू शकता. वर्च्युअल आयडी तयार केल्यानंतर आधार कार्डला लॉक लावण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम myAadhaar च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- आता खाली स्क्रोल केल्यानंतर Lock/Unlock Aadhar पर्यायावर क्लिक करा.
- सर्व माहिती व्यवस्थितीत वाचून Next पर्यायावर क्लिक करा.
- वर्च्युअल ID, आपले संपूर्ण नाव, पिनकोड, कॅप्चा कोड टाकून Send OTP वप क्लिक करा.
- ओटीपी दिल्यानंतर आधार कार्ड लॉक करण्यासाठी Submit वर क्लिक करा.
- आधार कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय हे कसे शोधून काढाल?
तुमच्या परवानगीशिवाय आधार कार्डचा वापर केला जातोय की नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेजवरील Log In च्या पर्यायावर क्लिक करा.
- लॉग इन केल्यानंतर आधार कार्डवरील 12 अंकी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
- ओटीपी दाखल केल्यानंतर लॉगइन करा.
- आता ऑथेंटिकेशन टाइट डेटा आणि OTP वेरिफिकेशननंतर आधार कार्डचा कुठेकुठे वापर केलाय याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल.
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : मतदान कार्ड हरवलेय? ऐन निवडणुकीवेळी असे करता येईल मतदान