मे महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या कोणत्या तारखेला असणार बंद

| Published : Apr 29 2024, 06:16 PM IST

bank holiday today

सार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. तुमच्याकडे बँकिंगशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. मे महिन्यात अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असतील.मे महिन्यात एकूण 10 दिवस बंद राहतील. 

मे महिना अनेकांना सुट्टी असली तरी बँकेची कामे सुरुच असतात मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यातील सुट्टीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 10 दिवस बँक बंद राहणार असून ऑनलाईन व्यवहार सुरु राहतील असे सांगण्यात आले आहे.बुधवारपासून सुरू होणाऱ्या मे महिन्यात किमान १० दिवस बँका बंद राहणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मे महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांसह किमान १० दिवस कोणतंही कामकाज होणार नाही. याशिवाय मतदानाच्या दिवशी संंबंधित मतदारसंघातील बँकांसह सर्व कार्यालयांना सुट्टी असेल. काही राज्यांमध्ये स्थानिक सणांच्या दृष्टीने देखील सुट्ट्याही असू शकतात असे सांगण्यात आले आहे.

याशिवाय लोकसभा निवडणुकीमुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मे महिन्यात रवींद्रनाथ टागोर यांची जयंती, अक्षय्य तृतीया असे अनेक सण आहेत, त्यामुळे बँकांचे कामकाज होणार नाही. मे महिन्यात काही दिवस बँका बंद राहतील, मात्र या काळात ऑनलाईन व्यवहार सुरु राहतील. सुट्टीच्या दिवशी बँकेशी संबंधित काम असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता.

मे महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या :

1 मे - या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.

8 मे - पश्चिम बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

10 मे : अक्षय्य तृतीया सणानिमित्त बँका बंद राहतील.

23 मे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँका बंद राहतील.

दुसऱ्या शनिवारी 11 मे रोजी बँका बंद राहतील

चौथ्या शनिवारी 25 मे रोजी बँका बंद राहतील.

रविवार : 4, 12, 18 आणि 26 मे