सार

Technology : CERT-In ने क्रोम युजर्सला उपलब्ध सिक्युरिटी तातडीने अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यावेळी एखादा नवा सिक्युरिटी पॅच जारी केला जातो तेव्हा आपले ब्राउजर अपडेट करावे.

Technology : तुम्ही गुगल क्रोमचा वापर करत असल्यास ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण क्रोमचे कोट्यावधी युजर्स धोक्यात आले आहेत. भारत सरकारने क्रोमच्या युजर्सला एक इशारा दिला आहे. खरंतर, कंप्युटर इमर्जेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-in) कडून गुगल क्रोम वेब ब्राउजरच्या काही वर्जनमध्ये त्रुटी असल्याचे शोधून काढले आहे. याच संदर्भात युजर्सला इशारा दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, क्रोम वेब ब्राउजरमधील त्रुटींचा फायदा घेत हॅकर्स संभाव्य रुपात काही विशिष्ट कोड वापरून, डिनायल ऑफ सर्विसच्या स्थितीला ट्रिगर करण्यासह संवेदनशील माहिती मिळवू शकतात. सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास हॅकर्स त्रुटींचा फायदा घेत तुमचा फोन हॅक करत त्यामधील सर्व डेटा चोरू शकतात. या डेटामध्ये तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह केलेले पासवर्ड किंवा आर्थिक अ‍ॅपमधील माहितीही मिळवू शकतात. अशातच काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया....

हॅकर्सपासून दूर राहण्यासाठी काय करावे?
CERT-in ने क्रोम युजर्सला उपलब्ध असलेली सिक्युरिटी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय एखाद्या नव्या सिक्युरिटीचा पॅच जारी केल्यानंतर आपले ब्राउजरही अपडेट करावे. तुम्ही ब्राउजर स्वत:हून देखील अपडेट करू शकता.

क्रोम ब्राउजर असे करा अपडेट

  • सर्वप्रथम गुगल क्रोम सुरू करा.
  • आता ड्रॉप-डाउन-मेन्यूवर जा आणि उजव्या बाजूला वरच्या कॉर्नरला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.
  • Help पर्याय निवडा.
  • सबमेन्यूमधील About Google Chrome पर्याय निवडा.
  • गुगल क्रोम ऑटोमॅटिक अपडेट तपासून पाहिल आणि अपडेट्स उपलब्ध झाल्यानंतर इंस्टॉल प्रोसेस सुरू करेल.
  • अपडेट पूर्ण झाल्यानंतर Google Chrome चे लेटेस्ट वर्जन तुम्हाला वापरण्यास मिळेल.
  • याशिवाय फोनमध्ये गुगल क्रोम वापर नसल्यास Play Store मधूनही क्रोम अपडेट करू शकता.