Passport Tips: पासपोर्टमधील या एका चुकीमुळे जावं लागेल तुरुंगात, जाणून घ्या काय आहे कारण

| Published : May 28 2024, 03:24 PM IST

Henley Passport Index France Tops

सार

पासपोर्टसाठी अर्ज करताना लोक अनेकदा चुका करतात. मात्र ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि या चुकीमुळे पासपोर्टसाठी अर्ज करणारी व्यक्ती तुरुंगात जाऊ शकते.

 

भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येतो. मात्र, पासपोर्टसाठी अर्ज करताना काही वेळा लोक फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की या एका चुकीमुळे तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला या बातमीत त्या चुकीबद्दल सांगत आहोत.

अशी काही कागदपत्रे आहेत जी देशातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठीही पासपोर्ट आवश्यक आहे. ते तयार करण्यासाठी एक कठोर प्रक्रिया आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर पोलिस पडताळणी केली जाते. त्यानंतरच पासपोर्ट बनवला जातो. पासपोर्टसाठी अर्ज करताना लोक अनेकदा चुका करतात. या चुकीमुळे पासपोर्टसाठी अर्ज करणारी व्यक्ती तुरुंगातही जाऊ शकते. वास्तविक, पासपोर्टसाठी अर्ज करताना लोक काही माहिती लपवतात. अनेकवेळा असे घडते की लग्न होऊनही लोक लग्न न झाल्याच्या बॉक्सवर टिक करतात.

पासपोर्टसाठी अर्ज करताना चुकीची माहिती दिल्यास होतो एवढा दंड :

पासपोर्टसाठी अर्ज करताना चुकीची माहिती दिल्यास 5,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. जाणूनबुजून माहिती लपवणे हा गुन्हा आहे. जर कोणी जाणूनबुजून माहिती लपवली तर तो फौजदारी गुन्हा मानला जाईल आणि त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पासपोर्टसाठी अर्ज करताना कोणतीही माहिती लपवू नये.

ही माहिती लावल्यास होईल गुन्हा दाखल :

लग्न, शिक्षण, मार्क चुकीचे नाव यांसह विविध छोट्या छोट्या चुका तुम्हाला नंतर महागात पडू शकतात यामुळे तुम्हला माहिती लावण्याच्या गुन्ह्यामध्ये पोलीस अटकही करू शकता किंवा दंड आकारू शकता.

आणखी वाचा : 

iPhone 15 वर बंपर डिस्काउंट, 'या' ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दिली जातेय तब्बल 13 हजार रुपयांची सूट

WhatsApp अकाउंट चुकून ब्लॉक झालेय? Unblock करण्याची सोपी ट्रिक घ्या जाणून स्टेप बाय स्टेप