सार
वनप्लस 13 आणि वनप्लस 13R स्मार्टफोन आज लाँच होण्याच्या पूर्ण तयारीत आहे. या स्मार्टफोनमध्ये युजर्सला धमाकेदार कॅमेरा, पॉवरफुल रॅम आणि प्रोसेसरसह बॅटरी मिळणार आहे. जाणून घेऊया स्मार्टफोनच्या फीचर्ससह किंमतीबद्दल सविस्तर...
OnePlus 13 Series Launch Today : नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दिवस बेस्ट आहे. गेल्या आठवड्यात काही स्मार्टफोन लाँच झाले असले तरीही आज (07 जानेवारी) वनप्लस 13 आणि वनप्लस 13R स्मार्टफोन लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना धमाकेदार फीचर्स ते कॅमेरा मिळणार आहे. याच स्मार्टफोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
OnePlus 13 Series
वनप्लस 13 सीरिजमध्ये दोन मॉडेल असणार आहेत. यामध्ये पहिला OnePlus 13 आणि दुसरा OnePlus 13R स्मार्टफोनचा समावेश आहे. OnePlus 13 आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. आता भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये जुन्या मॉडेलमधून 50 मेगापिक्सलचा LYT-808 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याच्या टेलीफोटो आणि अल्ट्रावाइड लेन्समध्ये 50 मेगापिक्सला नवा सेंसर आहे. याशिवाय स्मार्टफोन 4K/60fps डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
याशिवाय OnePlus 13 स्मार्टफोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे. यामुळे पाणी आणि उच्च पाण्याच्या दाबापासून फोन सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. यामध्ये एक अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसरही आहे. यामुळे ओलसर हात असला तरीही स्मार्टफोन अनलॉक करता येणार आहे. गेमिंगची मजा अधिक वाढवण्यासाठी फोनमध्ये रिफाइंड वाइब्रेशन मोटर दिली आहे.
हेही वाचा : ५००० रुपयांतून सुरू करा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय, कमवा ४०-५० हजार
प्रोसेसर
OnePlus 13 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट दिली आहे. तर OnePlus 13R मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असणार आहे. दोन्ही स्मार्टफोन OxygenOS 15 वर काम करणार आहेत. याशिवाय OnePlus 13R स्मार्टफोनमध्ये 1.5K रेजोल्यूशन डिस्प्ले असू शकतो. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला जाणार आहे.
OnePlus 13 Series ची किंमत
काही ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, OnePlus 13R स्मार्टफोनची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. तर OnePlus 13 ची किंमत 70 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :
Redmi Note 13 256GB स्मार्टफोनवर धमाकेदार सूट, ऑफर संपण्याआधीच करा बुकिंग