सार
रेडमी कंपनीचा नोट 13 स्मार्टफोनच्या 256 जीबी वेरिएंटवर धमाकेदार ऑफर दिली जात आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टला भेट द्यावी लागेल. जाणून घेऊया रेडमी नोट 13 256 जीबी स्मार्टफोनवरील डिस्काउंटसह फीचर्सबद्दल सविस्तर...
Redmi Note 13 256GB Offer : नव्या वर्षाची सुरुवात होताच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ग्राहकांना वेगवेगळ्या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर दिली जात आहे. अशातच रेडमी कंपनीचा मिडरेंज स्मार्टफोन रेडमी नोट 15 5 जी स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमीची डील नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
Redmi Note 13 5G स्मार्टफोनचा लूक स्टायलिश असून आतापर्यंत ग्राहकांनी प्रोडक्ट्सला उत्तम रिव्हू दिले आहेत. तुम्ही 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमीच्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि डिस्काउंटमधील किंमतीबद्दल पुढे सविस्तर जाणून घ्या.
रेडमी नोट 13 5 जी स्मार्टफोनवरील डिस्काउंट आणि ऑफर
Redmi Note 13 5G स्मार्टफोनच्या 256 GB वेरिएंटवर फ्लिपकार्टच्या माध्यमातून 28 टक्क्यांची सूट दिली जात आहे. फोनची किंमत 24,999 रुपये असून डिस्काउंटनंतर याची किंमत केवळ 17,973 रुपये झाली आहे. फोन ग्रेफाइट ब्लॅक, आर्कटिक व्हाइट, ओशन टीन आणि प्रिज्म गोल्ड रंगाच्या ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. फोनवर 28 टक्क्यांच्या सूटसह 5 टक्के कॅशबॅकची ऑफरही मिळत आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डचा वापर करून या ऑफरचा फायदा घेता येऊ शकतो. या फोनला 632 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल.
हेही वाचा : BSNLची डिजिटल क्रांती: स्वस्त रिचार्ज, सुपरफास्ट इंटरनेट!
Redmi Note 13 5G स्मार्टफोनचे फीचर्स
रेडमी नोट 13 5 जी स्मार्टफोन वर्ष 2024 मध्ये जानेवारी महिन्यात लाँच झाला होता. यामध्ये 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला असून 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेसवर काम करतो. फोनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे. रेडमीचा फोन Android 13 वर काम करतो. यामध्ये Mediatek Dimensity 6080 चिपसेट दिली आहे. फ्लिपकार्टवर फोन 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. एक 108MP मुख्य सेंसर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
आणखी वाचा :