डिसेंबरमध्ये या दिवशी बँका राहणार बंद, आजच माहित करून घ्या
डिसेंबर महिन्यात बँकेला अनेक सुट्ट्या आहेत, ज्यात काही राज्यांपुरत्या मर्यादित आहेत तर काही देशव्यापी आहेत. या लेखात ३ डिसेंबर, २५ डिसेंबर (ख्रिसमस) आणि २६ डिसेंबर रोजी कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील याची माहिती दिली आहे.

डिसेंबरमध्ये या दिवशी बँका राहणार बंद, आजच माहित करून घ्या
आपण आज डिसेंबर महिन्यात बँकेला किती सुट्या असतात ते जाणून घेऊयात. सोमवारी बँकेला १ डिसेंबरला सुट्टी राहणार आहे. तर काही बँकांमध्ये आज कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळं आज बँकेत जाताना सुट्टी आहे का नाही हे जाणून आपण जायला हवं.
महाराष्ट्रातील बँक सुरु राहणार
महाराष्ट्रातील बँक आज सुरु राहणार आहेत. आज अरुणाचल प्रदेश आणि नागालँड येथील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं आपण आज बँकेतून नियमितपणे काम करू शकणार आहेत.
डिसेंबर महिन्यात कोणत्या सुट्या राहणार आहे?
बँकेला डिसेंबर महिन्यात १८ दिवस सुट्ट्या राहणार आहेत. बँकेला भेट देण्यापूर्वी आपण सुट्टी आहे का नाही हे जाणून घ्यायला हवं. ३ डिसेंबर रोजी गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर्स डेनिमित्त बँका बंद राहतील.
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमसची सुट्टी राहणार
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमसची सुट्टी बँक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं या दिवशी करता येणारी काम आपण आधीच करून घ्यावे लागणार आहेत. या दिवशी सरकारी ऑफिसला सुट्टी असणार आहे.
नाताळाच्या दुसऱ्या दिवशी राहणार सुट्टी?
नाताळाच्या दुसऱ्या दिवशी काही राज्यांमध्ये सुट्ट्या राहणार आहे. २६ डिसेंबर रोजी मेघालय, मिझोराम आणि तेलंगणा येथे या बँक बंद राहणार आहे. त्यामुळं या राज्यांमध्ये कारभार बंद राहील.
१५ दिवस राहणार सुट्ट्या?
१५ दिवस बँकेला सुट्ट्या राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात १५ दिवस कामकाज बंद राहणार आहे. २५ डिसेंबर रोजी सुट्टी घेतल्यावर शुक्रवारची सुट्टी टाकायची आणि चौथा शनिवार जोडून ४ सुट्ट्या येतात.

