Astrology: 'या' राशींच्या पुरुषांचे वैवाहिक जीवन असते कलहाने भरलेले, कारण...
Astrology: लग्न म्हणजे सात जन्माचं बंधन, असं म्हणतात. पण सगळ्यांच्याच नशिबी सुखी संसार नसतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींचे पुरुष नवरा म्हणून फारच त्रासदायक ठरू शकतात! कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात या लेखात…
15

Image Credit : Asianet News
मेष राशीचे पुरुष
मेष राशीचे पुरुष खूप पॅशनेट असतात, पण त्यांच्यात संयम नसतो. ते कोणताही विचार न करता पटकन निर्णय घेतात. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Asianet News
मिथुन राशीचे पुरुष
या राशीचे पुरुष कधी खूप प्रेमळ वागतात, तर कधी एकदम अंतर ठेवतात. त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे पत्नीला त्रास होतो. त्यांच्यासोबत आयुष्यात स्थैर्याची भावना कमी जाणवते.
35
Image Credit : Asianet News
धनु राशीचे पुरुष
धनु राशीचे पुरुष लग्नानंतरही स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देतात. ते कुटुंब आणि पत्नीपेक्षा स्वतःच्या 'स्पेस'ला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना नात्यात वचनबद्ध राहणं कठीण वाटू शकतं.
45
Image Credit : Asianet News
कुंभ राशीचे पुरुष
कुंभ राशीचे पुरुष खूप लॉजिकल विचार करतात, पण त्यांना भावना व्यक्त करणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आवश्यक असलेला भावनिक आधार मिळत नाही.
55
Image Credit : Asianet News
मकर राशीचे पुरुष
मकर राशीच्या पुरुषांसाठी त्यांचं कामच सर्वस्व असतं. ते कुटुंबाला कमी वेळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार, यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो.

