MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • Red Ant Chutney: लाल मुंग्यांची चटणी! प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 चा खजिना, एकदा खाल तर चव विसरणार नाही

Red Ant Chutney: लाल मुंग्यांची चटणी! प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 चा खजिना, एकदा खाल तर चव विसरणार नाही

झाडांवर राहणाऱ्या लाल मुंग्या गोळा करून त्यांची झणझणीत चटणी बनवण्यापासून ते थेट हॉटेलच्या मेन्यूमध्ये पोहोचण्यापर्यंतचा या चटणीचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 24 2026, 10:47 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
झाडावरच्या लाल मुंग्यांची थेट चटणी?
Image Credit : Linkedin

झाडावरच्या लाल मुंग्यांची थेट चटणी?

हॉटेलच्या मेन्यू कार्डवर तुम्ही कधी मुंग्यांची चटणी पाहिली आहे का? झाडांवर रांगेत चालणाऱ्या लाल मुंग्या पकडून त्यांची चटणी बनवली जाते, हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील. पण, ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील लोकांसाठी ही काही नवीन गोष्ट नाही.

पिढ्यानपिढ्या इथल्या आदिवासी समाजाचा हा आवडता पदार्थ आहे. हीच लाल मुंग्यांची चटणी आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. जगभरात अनेक ठिकाणी कीटक खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

इंडोनेशिया आणि मलेशियासारख्या देशांप्रमाणेच आपल्या भारतातही अशा काही अनोख्या खाद्यपरंपरा आहेत. यात ओडिशाच्या या लाल मुंग्यांच्या चटणीने आपल्या वेगळ्या चवीमुळे आणि परंपरेमुळे संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
'काई चटणी'ला मिळालाय जीआय टॅग!
Image Credit : x

'काई चटणी'ला मिळालाय जीआय टॅग!

इंग्रजीत 'रेड विव्हर अँट्स' (Red Weaver Ants) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लाल मुंग्यांना स्थानिक लोक 'काई' (Kai) म्हणतात. म्हणूनच या मुंग्यांपासून बनवल्या जाणाऱ्या चटणीला 'काई चटणी' असं नाव पडलं.

हा फक्त एक वेगळा खाद्यपदार्थ नाही, तर यामागे एक मोठा संघर्ष दडलेला आहे. अनेक प्रयत्नांनंतर, २ जानेवारी २०२४ रोजी मयूरभंजच्या "सिमिलिपाल काई चटणी"ला अधिकृतपणे भौगोलिक मानांकन (GI Tag) देण्यात आलं आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

35
मुंग्या कशा पकडल्या जातात?
Image Credit : x

मुंग्या कशा पकडल्या जातात?

ही चटणी बनवण्याची पद्धत खूपच रंजक आहे. मयूरभंजच्या जंगलात जाणारे लोक झाडांच्या पानांवर मुंग्यांनी बनवलेली घरटी शोधतात. बहुतांश वेळा ही घरटी पहाटेच्या वेळीच गोळा केली जातात. लोक मुंग्यांसोबत त्यांची अंडीही काढून घेतात.

पण, हे काम वाटतं तितकं सोपं नाही. या लाल मुंग्यांनी चावा घेतल्यास त्वचेवर सुई टोचल्यासारख्या भयंकर वेदना होतात आणि फोडही येतात. त्यामुळे ही घरटी गोळा करणाऱ्या लोकांना खूप काळजीपूर्वक आणि सावधगिरीने काम करावं लागतं.

45
झणझणीत पारंपरिक रेसिपी
Image Credit : x

झणझणीत पारंपरिक रेसिपी

घरट्यातून मुंग्या आणि अंडी काळजीपूर्वक गोळा करून आणल्यानंतर, लोक ती स्वच्छ करतात आणि स्वयंपाकाला सुरुवात करतात. स्वच्छ केलेल्या मुंग्यांमध्ये मीठ, आलं, लसूण आणि सुक्या लाल मिरच्या टाकून वाटण तयार केलं जातं.

काही भागात चव वाढवण्यासाठी यात पुदिनाही घातला जातो. शेवटी तिखट आणि आंबट चवीचं अचूक प्रमाण असलेली, तोंडाला पाणी आणणारी भन्नाट चटणी तयार होते! स्थानिक लोक ही चटणी गरमागरम भात आणि नाचणीसारख्या पारंपरिक पदार्थांसोबत आवडीने खातात.

55
मुंग्यांमध्ये दडलेत एवढे पोषक घटक?
Image Credit : x

मुंग्यांमध्ये दडलेत एवढे पोषक घटक?

ही चटणी फक्त जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या स्वयंपाकघरापुरती मर्यादित राहिलेली नाही. मयूरभंजच्या आठवडी बाजारातही ती विक्रीसाठी येते. एवढंच नाही, तर काही हॉटेल्समध्ये "लाल मुंग्यांची चटणी" असा खास बोर्ड लावून ती सर्व्ह केली जाते. तिखट आणि आंबट चवीच्या या अनोख्या मिश्रणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक आवर्जून येतात.

सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात असलेले पोषक घटक. या चटणीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह (Iron), झिंक आणि व्हिटॅमिन B-12 सारखे आवश्यक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हा केवळ एक पारंपरिक पदार्थ नसून, शरीराला ताकद देणारा आहार आणि शेकडो आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेचं मुख्य साधन बनला आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Best Bikes Under 1.5 Lakh: मायलेज पण भारी आणि लूक पण कडक! कॉलेज स्टुडंट्ससाठी 1.5 लाखांच्या आत टॉप 5 बाईक्स
Recommended image2
IRCTC Current Booking : चार्ट लागल्यावरही कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं? पाहा ही भन्नाट ट्रिक
Recommended image3
Gautam Adani : मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Recommended image4
Gold Rate Today : 24 सप्टेंबरचे सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर, तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव
Recommended image5
Petrol Diesel Prices : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत? जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved