- Home
- Utility News
- Brake Failure Tips : चालत्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय कराल? हे 5 उपाय वाचवतील जीव
Brake Failure Tips : चालत्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय कराल? हे 5 उपाय वाचवतील जीव
गाडी चालवताना अचानक ब्रेक फेल झाला तर अनेक जण घाबरून इंजिन बंद करतात किंवा हँडब्रेक ओढतात. पण या चुका महागात पडू शकतात. अशा वेळी गाडी सुरक्षित कशी थांबवायची, हे नक्की जाणून घ्या.

इंजिन बंद करू नका
हायवेवर गाडी वेगात असताना अचानक ब्रेक फेल झाला, तर ड्रायव्हर घाबरून दोन मोठ्या चुका करतात. पहिली चूक म्हणजे इंजिन बंद करणे आणि दुसरी म्हणजे हँडब्रेक ओढणे. कार असो वा बाईक, या दोन्ही चुका टाळा. याऐवजी गाडी सुरक्षितपणे कशी थांबवायची, याकडे लक्ष द्या.

या २ चुका कधीच करू नका
इंजिन बंद करणे!
ब्रेक फेल झाल्यावर लोक सर्वात आधी गाडीची चावी काढून इंजिन बंद करतात. तुम्ही इंजिन बंद केले, तर स्टिअरिंग व्हील लगेच लॉक होते. यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटते आणि गाडी पलटी होण्याची शक्यता वाढते.
हँडब्रेक ओढला तर काय होईल?
गाडीचा वेग ६० किमी प्रति तास पेक्षा जास्त असताना तुम्ही हँडब्रेक ओढला, तर मागची चाके लॉक होतात. यामुळे गाडी स्लिप होऊन मोठा अपघात होऊ शकतो.
मग नक्की काय करावे?
स्टेप १:
- ब्रेक पेडल वेगाने दाबा.
- कधी कधी ब्रेक काम करत नाहीत.
- ब्रेक पेडल एकदा दाबून सोडू नका.
- सलग ४ ते ५ वेळा वेगाने दाबा.
- यामुळे ब्रेक थोडेफार काम करायला सुरुवात करेल.
स्टेप २:
- इंजिन ब्रेकिंगचा वापर करा.
- गाडीचा वेग कमी करण्याचा हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
- तुमची कार ५ व्या गिअरमध्ये असेल.
- तर लगेच ४ थ्या गिअरवर आणा.
- त्यानंतर हळूहळू ३ ऱ्या.
- मग २ ऱ्या आणि १ ल्या गिअरवर आणा.
- गिअर कमी केल्याने गाडीचा वेग आपोआप कमी होतो.
स्टेप ३:
- हझार्ड लाइट (धोक्याचा इशारा देणारे दिवे) चालू करा.
- सतत हॉर्न वाजवा.
- यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांना धोक्याचा इशारा मिळेल.
- लगेच तुमचे डबल इंडिकेटर चालू करा.
- सतत हॉर्न वाजवत राहा.
- यामुळे इतर लोक तुम्हाला रस्ता देतील.
स्टेप ४:
- गाडीचा वेग ३० किमी पेक्षा कमी झाल्यावर हँडब्रेक वापरा.
- इंजिन ब्रेकिंगमुळे गाडीचा वेग ताशी ३० किमी पर्यंत खाली येईल.
- तेव्हा काळजीपूर्वक हँडब्रेक वर ओढा.
- यामुळे कार सुरक्षित थांबेल.
स्टेप ५:
जर तुम्ही एखाद्या मोठ्या दरीत किंवा धोकादायक ठिकाणी असाल आणि गाडी थांबत नसेल, तर गाडीचे टायर डिव्हायडरकडे किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या माती, वाळू, खडी किंवा लहान झुडपांकडे हळूच वळवा. घर्षणामुळे गाडीचा वेग लगेच कमी होईल.
बाईकचा ब्रेक फेल झाला तर काय करावे?
- सर्वात आधी ॲक्सिलरेटर सोडून द्या.
- कारप्रमाणेच बाईकचे गिअर सुद्धा एक-एक करून कमी करा.
- फक्त गिअर बदलताना क्लचचा वापर करा.
- गिअर बदलल्यावर क्लच पूर्णपणे सोडून द्या.
- असे केल्याने बाईकचा वेग कमी होऊन ती थांबेल.
- बाईक सुद्धा टप्प्याटप्प्यानेच थांबवा.
प्रवासाला निघण्यापूर्वी नेहमी ब्रेक ऑइल आणि ब्रेक पॅडची झीज तपासण्याची सवय ठेवा.







