- Home
- Utility News
- Aadhaar Card Email Update : आधार कार्डला ईमेल आयडी फ्रीमध्ये कसा लिंक करायचा? ऑनलाइन अपडेटची सोपी पद्धत
Aadhaar Card Email Update : आधार कार्डला ईमेल आयडी फ्रीमध्ये कसा लिंक करायचा? ऑनलाइन अपडेटची सोपी पद्धत
आधार कार्डला ईमेल आयडी लिंक करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आता एकही रुपया लागणार नाही. UIDAI ने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत केली आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे काम करू शकता.

ऑनलाइन आधार-ईमेल अपडेट
आधार कार्डला ईमेल आयडी लिंक किंवा अपडेट करण्याबाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. UIDAI च्या नव्या घोषणेनुसार, आधार कार्डमध्ये ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी आता कोणतेही शुल्क लागणार नाही. पूर्वी या कामासाठी ७५ रुपये मोजावे लागायचे.
पण आता तुम्ही हे काम घरबसल्या अगदी मोफत करू शकता. मात्र, या मोफत सेवेला एक मुदत आहे. ही मोफत सेवा कशी मिळवायची आणि ऑनलाइन पद्धतीने ईमेल आयडी कसा अपडेट करायचा, याची सोपी पद्धत…

आधार कार्डमध्ये ईमेल आयडी का अपडेट करावा?
सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठीच सरकारने आधार कार्डला ईमेल आयडी लिंक करण्याची सुविधा आणली आहे. जेव्हा कोणी तुमच्या आधार कार्डचा वापर करून ऑनलाइन e-KYC करेल, तेव्हा तुमच्या ईमेलवर लगेच एक सिक्युरिटी अलर्ट येईल.
याशिवाय, अपडेट केलेल्या आधार कार्डची PDF फाईल थेट तुमच्या ईमेलवर येते. UIDAI शी संपर्क साधण्यासाठी किंवा कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी सुद्धा हा ईमेल आयडी खूप कामी येतो.
ॲपवरून ईमेल आयडी कसा अपडेट करायचा?
आधार कार्डला ईमेल आयडी लिंक करण्यासाठी आता तुम्हाला आधार केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच हे काम सहज करू शकता.
यासाठी सर्वात आधी अधिकृत 'mAadhaar' ॲप डाउनलोड करा. ॲप ओपन करून सुरक्षितपणे लॉग-इन करा. त्यानंतर 'Update Email ID' या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला जो ईमेल आयडी लिंक करायचा आहे, तो तिथे टाका. त्यानंतर तुमच्या ईमेलवर एक OTP येईल. हा OTP टाकून व्हेरिफाय करा. OTP व्हेरिफाय होताच तुमची ईमेल अपडेटची रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
सध्या फक्त आधार कार्डमध्ये ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा मोफत आहे. तुम्ही ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत या मोफत सेवेचा लाभ घेऊ शकता. पण जर तुम्हाला आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा फोटो बदलायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल आणि नेहमीप्रमाणे ठरलेले शुल्क भरावे लागेल. या इतर सुविधांसाठी कोणतीही मोफत सवलत नाही.






