Non-veg recipe : साध्या सोप्या पद्धतीने बनवा मटण पुलाव, नवशिक्यांसाठी खास रेसिपी
Non-veg recipe : मटण पुलाव (Mutton Pulao) म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. पण तो बनवायचा कसा, असा अनेकांना प्रश्न पडतो. नवशिक्यांनाही बनवता येईल, अशी रेसिपी आम्ही इथे दिली आहे. मटण पाण्यात उकडवून तयार ठेवल्यास अर्ध्या तासात मटण पुलाव बनवता येतो.

चविष्ट मटण पुलाव
रविवार आला की, मटण खायचं की चिकन, याची चर्चा होते. आम्ही तुमच्यासाठी मटण पुलावची सोपी रेसिपी देत आहोत. नवशिकेही हा पुलाव सहज बनवू शकतात. मटण शिजवून ठेवल्यास पुलाव झटपट होतो.
मटण पुलावसाठी लागणारे साहित्य
अर्धा किलो मटण, एक किलो बासमती तांदूळ, दही, तेजपत्ता, मीठ, तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, खसखस, धणे, आले, लसूण, कांदे, तूप आणि काजू घ्या.
मटण पुलाव रेसिपी
तांदूळ भिजवा. मटण हळद, मीठ, वेलची घालून कुकरमध्ये शिजवा. खसखस, धणे, आले, लसूण, मिरची वाटून घ्या. भांड्यात तूप, कांदा आणि वाटलेला मसाला परतून घ्या.
पंधरा मिनिटे शिजवा
परतलेल्या मसाल्यात काजू, पुदिना, कोथिंबीर, तेजपत्ता, दही घालून मिसळा. शिजवलेले मटण घालून परता. नंतर भिजवलेले तांदूळ, पाणी, मीठ, तिखट घालून मंद आचेवर 15 मिनिटे शिजवा.
मटणाचे छोटे तुकडे
घरी पाहुणे आल्यावर असा मटण पुलाव नक्की करून बघा. रायत्यासोबत याची चव अप्रतिम लागते. पुलावसाठी मटणाचे छोटे तुकडे वापरल्यास तो अधिक चविष्ट होतो.

