Non-vegetarian dish : काही मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे पेपर चिकन! ही आहे रेसिपी
Non-vegetarian dish : सध्या थंडीचा कडाका हळूहळू वाढत चालला आहे. या थंड वातावरणात पेपर चिकनचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता... रेस्टॉरंटमधून ऑर्डर करण्याची गरज नाही. रेसिपी कशी बनवायची ते जाणून घ्या.

टेस्टी पेपर चिकन!
मस्त थंडीच्या मोसमात काहीतरी मसालेदार खाण्याची इच्छा होते. विशेषतः, नॉन-व्हेज प्रेमींना चिकनचे पदार्थ पसंत असतात. अशावेळी घरीच पेपर चिकन बनवण्याचा प्रयत्न करा. रेस्टॉरंटमधून ऑर्डर केल्यास खर्च जास्त येतो आणि क्वांटिटीही कमी असते.
पेपर चिकन रेसिपीसाठी लागणारे साहित्य
अर्धा किलो चिकन, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, पाव चमचा हळद, तेल, मीठ, दीड चमचा आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, एक टोमॅटो, एक कांदा आणि अर्धा चमचा व्हिनेगर तयार ठेवा.
पेपर चिकन असे बनवा
कढईत कांदा, आले-लसूण पेस्ट परतून घ्या. टोमॅटो, मसाले घालून चिकन शिजवा. पाणी आटल्यावर व्हिनेगर आणि कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. अधिक चवीसाठी पेपर चिकन मसाला वापरा.
घरी बनवणेच फायदेशीर
पेपर चिकन घरी बनवणे सोपे आणि स्वस्त आहे. रेस्टॉरंटमध्ये यासाठी जास्त पैसे घेतले जातात. ही डिश चपाती, रोटी किंवा राईससोबत अप्रतिम लागते. घरी नक्की करून पाहा.
आरोग्यासाठीही उत्तम
चिकनमधील लीन प्रोटीन आरोग्यासाठी उत्तम आहे. यातील मिरी, कोथिंबीर, टोमॅटो पौष्टिक आहेत. थंड वातावरणात हे खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

