Food Tips : शिजवलेली चिकन करी फ्रिजमध्ये एकूण किती दिवस ठेवू शकता? घ्या जाणून..
Food Tips : एखादा पदार्थ खूप आवडतो, पण शिल्लक राहिला तर, तो खराब होण्याची भीती असते. पण, तुम्ही आज बनवलेली चिकन करी फ्रिजमध्ये किमान तीन ते चार दिवस ठेवू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

चिकन करी...
रविवार आला की आपल्यापैकी बरेच जण घरी चिकन नक्की बनवतात. पण, कधीकधी बनवलेली भाजी उरते. हे जवळपास सगळ्यांच्याच घरी घडतं. उरलेली चिकन करी रात्री फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ली जाते. जर दुसऱ्या दिवशी खाणं शक्य झालं नाही, तर बरेच जण ती फेकून देतात. पण, आपण घरी बनवलेली चिकन करी फ्रिजमध्ये किती दिवस ठेवू शकतो? चिकन किती दिवस ताजं राहतं? याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया...
किती तापमानात साठवणूक करावी?
तुम्ही आज बनवलेली चिकन करी फ्रिजमध्ये किमान तीन ते चार दिवस ठेवू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. फ्रिजचं तापमान नेहमी 40°F (4°C) पेक्षा कमी असेल, तर तुम्ही ते 3 ते 4 दिवस ठेवू शकता. चिकन ब्रेस्ट असो किंवा चिकन खिमा, ते या तापमानात ताजे राहतात. पण, यासाठी एक नियम पाळायला हवा. चिकन एअरटाईट डब्यात किंवा घट्ट बंद केलेल्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. यामुळे बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत होते.
फ्रीजरमध्ये सुद्धा...
जर तुम्हाला चिकन जास्त काळ टिकवायचं असेल, तर ते फ्रीझ करणं उत्तम. शिजवलेलं चिकन -18°C (0°F) तापमानात फ्रीजरमध्ये 9 महिन्यांपर्यंत ठेवता येतं. पण, त्याची चव आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी ते 2 ते 6 महिन्यांच्या आत वापरणं चांगलं. चिकनचे लहान तुकडे करून, गरजेनुसार वापरण्यासाठी फ्रीझर कंटेनर किंवा झिप-लॉक बॅगमध्ये ठेवा. फ्रोझन चिकन वापरण्यापूर्वी, ते 24 तास फ्रीजमध्ये ठेवून वितळू द्या किंवा थंड पाण्यात भिजवा. त्यानंतरच त्याचा पुन्हा वापर करा.
असे बदल दिसल्यास...
चिकन ताजं आहे की नाही, हे तपासणं महत्त्वाचं आहे. जर त्याला खराब वास येत असेल, रंग बदलला असेल किंवा ते मऊ आणि चिकट झालं असेल, तर ते खाऊ नये. तसेच, USDA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शिजवलेले चिकन दोन तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवलं पाहिजे. नाहीतर, खोलीच्या तापमानात जास्त वेळ ठेवल्यास बॅक्टेरिया लवकर वाढतात आणि अन्न खराब होतं.
हे आहेत काही नियम...
हे नियम रोटिसेरी चिकन, ग्रिल्ड चिकन किंवा चिकन करी यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांना लागू होतात. पण, सॉससोबत चिकन ठेवल्यास त्याचं शेल्फ लाइफ कमी होऊ शकतं. असे पदार्थ बनवल्यानंतर लगेच खाणं उत्तम.
थोडक्यात सांगायचं तर, योग्य तापमान, हवाबंद डबा आणि फ्रीझिंगची पद्धत यांसारखे नियम पाळून शिजवलेलं चिकन सुरक्षित ठेवता येतं. असं केल्याने अन्न खराब होत नाही, ते खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कोणताही धोका नसतो आणि अन्नाची नासाडीही होत नाही.

