Skoda Kushaq गाडीमध्ये आले नवीन अपडेट, या तारखेला होणार मार्केटमध्ये दाखल
स्कोडा इंडियाने कुशाकचे नवीन क्लासिक+, प्रेस्टिज आणि प्रेस्टिज+ व्हेरिएंट्स लॉन्च केले आहेत. या नवीन मॉडेल्समध्ये सनरूफ, क्रूझ कंट्रोलसारखे प्रीमियम फीचर्स जोडण्यात आले असून, त्यांच्या किमती 8.25 लाख रुपयांपासून सुरू होतात.

Skoda Kushaq गाडीमध्ये आले नवीन अपडेट, या तारखेला होणार मार्केटमध्ये दाखल
स्कोडा इंडिया त्यांची गाडी घेऊन मार्केटमध्ये येत आहे. कंपनीने नवीन क्लासिक, प्रेस्टिज आणि व्हेरिएंटस लॉन्च केलं आहे. यात मिड-स्पेक सिग्नेचर आणि सिग्नेचर+ ट्रिम्समध्येही अतिरिक्त फीचर्स जोडली आहेत.
गाड्यांच्या किती आहे किंमती?
या गाड्यांच्या किंमती कंपनीने जाहीर केल्या आहेत. स्कोडा कायलॅक क्लासिक+ व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी 8.25 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी 9.25 लाख रुपये आहे.
टॉप-स्पेक प्रेस्टीजची किती राहणार किंमत?
टॉप-स्पेक प्रेस्टीज+ व्हेरिएंटची किंमत मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी 11.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी 12.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
गाडीत काय असणार फीचर्स?
गाडीत वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. स्कोडा कायलॅक क्लासिक+ व्हेरिएंटमध्ये क्लासिक ट्रिमच्या तुलनेत अनेक प्रीमियम फीचर्स जोडण्यात आले आहेत. यात सिंगल-पेन सनरूफ, ऑटो-डिमिंग इनर रियर व्ह्यू मिरर (IRVM), रेन-सेंसिंग वायपर्स, क्रूझ कंट्रोल, स्टीयरिंग-माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, 4-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि 16 इंच स्टील व्हील्स विथ कव्हर यांचा समावेश आहे.
ग्राहकांच्या अनुभवाला सोयीस्कर
फीचर्स क्लासिक व्हेरिएंटसारखे दिसून आले आहे. मिड स्पेक सिग्नेचर आणि सिग्नेचर प्लस + ट्रिम्समध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडेल्ससाठी पॅडल शिफ्टर्स तसंच रियर वायपर आणि वॉशर जोडलं आहे.
डिझाईनमध्ये काय केला बदल?
डिझाईनमध्ये गाडीच्या अनेक बदल करण्यात आले आहेत. कायलॅक डिझाईनची सेफ्टी फीचर्स आणि परफॉर्मन्स पूर्वीप्रमाणे आहेत. सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये कायलॅकला टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि किआ सोनेट यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागतो.

