MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • New Job Exit Rules 2026: नोकरी सोडताय? थांबा! १ एप्रिलपासून 'फुल अँड फायनल'चे नियम बदलले; आता ४८ तासांत मिळणार हक्काचा पैसा!

New Job Exit Rules 2026: नोकरी सोडताय? थांबा! १ एप्रिलपासून 'फुल अँड फायनल'चे नियम बदलले; आता ४८ तासांत मिळणार हक्काचा पैसा!

New Job Exit Rules 2026: १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन कामगार कायद्यामुळे नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठे बदल झाले आहेत. राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत पूर्ण पेमेंट, १ वर्षानंतर ग्रॅच्युइटी आणि बेसिक सॅलरी ५०% असणे अनिवार्य होणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 01 2026, 05:18 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नोकरी सोडताय? थांबा! १ एप्रिलपासून 'फुल अँड फायनल'चे नियम बदलले
Image Credit : Getty

नोकरी सोडताय? थांबा! १ एप्रिलपासून 'फुल अँड फायनल'चे नियम बदलले

मुंबई: जर तुम्ही सध्याची नोकरी सोडून नवीन संधी शोधण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिल २०२६ पासून देशात नवीन कामगार कायदा (Code on Wages) लागू होत असून, यामुळे कंपन्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे. आता राजीनामा दिल्यानंतर महिनोनमहिने पैशांची वाट पाहण्याचे टेन्शन कायमचे मिटणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१. अवघ्या ४८ तासांत 'सेटलमेंट' अनिवार्य
Image Credit : Getty

१. अवघ्या ४८ तासांत 'सेटलमेंट' अनिवार्य

आतापर्यंत नोकरी सोडल्यानंतर पगार, सुट्ट्यांचे पैसे आणि इतर थकबाकी मिळवण्यासाठी ४५ ते ९० दिवस लागायचे. मात्र, नव्या नियमाच्या कलम १७(२) नुसार, कर्मचाऱ्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापासून (Last Working Day) पुढील ४८ तासांच्या आत कंपनीला सर्व पेमेंट पूर्ण करावे लागेल. मग तुम्ही राजीनामा दिला असो किंवा कंपनीने तुम्हाला कामावरून काढले असो, हा नियम सर्वांना लागू असेल. 

Related Articles

Related image1
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा; 'या' ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार!
Related image2
गुड न्यूज! आज १ एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे नियम बदलले; २० लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी 'या' कागदपत्राची अट रद्द!
36
२. ग्रॅच्युइटीसाठी आता ५ वर्षांची गरज नाही!
Image Credit : Getty

२. ग्रॅच्युइटीसाठी आता ५ वर्षांची गरज नाही!

नोकरी करणाऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. जुन्या नियमानुसार ग्रॅच्युइटीसाठी एकाच कंपनीत ५ वर्षे काम करणे बंधनकारक होते. पण आता फक्त १ वर्षाची सेवा पूर्ण केली तरी तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठराल. नोकरी सोडल्यानंतर ३० दिवसांच्या आत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणे आता अनिवार्य आहे. 

46
३. सॅलरी स्ट्रक्चरमध्ये होणार 'हे' ३ मोठे बदल
Image Credit : Getty

३. सॅलरी स्ट्रक्चरमध्ये होणार 'हे' ३ मोठे बदल

नव्या नियमांमुळे तुमची सॅलरी स्लिप पूर्णपणे बदलणार आहे.

बेसिक सॅलरी ५०%: तुमच्या एकूण सीटीसी (CTC) पैकी किमान ५० टक्के हिस्सा हा 'बेसिक सॅलरी' असावा लागेल.

पीएफमध्ये मोठी वाढ: बेसिक सॅलरी वाढल्यामुळे तुमच्या पीएफ (PF) खात्यात दरमहा जास्त पैसे जमा होतील. यामुळे तुमची निवृत्तीनंतरची पुंजी मोठी असेल.

टेक-होम सॅलरीवर परिणाम: पीएफ कपात वाढल्यामुळे तुमच्या हातात येणारा मासिक पगार (Take-home salary) थोडा कमी होऊ शकतो, परंतु ही तुमची दीर्घकालीन बचत ठरेल. 

56
कंपनीने पैसे अडवले तर काय कराल?
Image Credit : X

कंपनीने पैसे अडवले तर काय कराल?

जर कंपनीने ४८ तासांच्या आत तुमचे पेमेंट केले नाही, तर तो कायद्याचा भंग मानला जाईल. अशा परिस्थितीत कर्मचारी कामगार विभागाकडे (Labor Department) तक्रार करू शकतात. विशेष म्हणजे, उशिरा मिळालेल्या रकमेवर तुम्ही कंपनीकडून व्याजाची मागणी देखील करू शकता. 

66
राजीनामा देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
Image Credit : Getty

राजीनामा देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

१. नोटीस पिरियड: तुमचा नोटीस पिरियड पूर्ण करा, अन्यथा कंपनी सेटलमेंटमधून पैसे कापू शकते.

२. टॅक्स डिक्लेरेशन: गुंतवणुकीचे पुरावे वेळेत सबमिट करा, जेणेकरून विनाकारण टॅक्स कापला जाणार नाही.

३. कंपनी अपडेट: तुमच्या एचआर (HR) विभागाकडून नवीन लेबर कोडच्या अंमलबजावणीबद्दल माहिती घ्या. 

१ एप्रिल २०२६ नंतरचे हे बदल कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि कायदेशीर बळ देणारे आहेत. आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा हक्काचा पैसा विनाकारण अडवून धरता येणार नाही.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा; 'या' ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार!
Recommended image2
गुड न्यूज! आज १ एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे नियम बदलले; २० लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी 'या' कागदपत्राची अट रद्द!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved