- Home
- Utility News
- Car Bike Insurance Rules : 15 डिसेंबरपासून कार-बाईक इन्शुरन्समध्ये मोठा बदल; आता 4 प्रकारच्या पॉलिसी, कोणती सक्तीची?
Car Bike Insurance Rules : 15 डिसेंबरपासून कार-बाईक इन्शुरन्समध्ये मोठा बदल; आता 4 प्रकारच्या पॉलिसी, कोणती सक्तीची?
१५ डिसेंबरपासून कार आणि बाईक इन्शुरन्सचे नवे नियम लागू होत आहेत. IRDAI ने ४ प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी आणल्या आहेत. कोणती पॉलिसी सक्तीची आहे आणि प्रीमियम वाढणार का? सविस्तर जाणून घेऊया.

कार-बाईक इन्शुरन्सचे नवे नियम
अपघात झाल्यास वाहनमालक आणि प्रवाशांना आर्थिक सुरक्षा देण्यात मोटर इन्शुरन्स महत्त्वाची भूमिका बजावतो. आता १५ डिसेंबरपासून भारतात मोटर इन्शुरन्सच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) प्रायव्हेट कार आणि दुचाकी वाहनांसाठी ४ स्तरीय इन्शुरन्स प्रणाली आणली आहे. यामुळे ग्राहकांना इन्शुरन्स कव्हरमध्ये नक्की काय मिळते, हे समजायला सोपे जाईल आणि ते आपल्या सोयीनुसार पॉलिसी निवडू शकतील.

नवी प्रणाली काय आहे?
नव्या नियमानुसार, मोटर इन्शुरन्स ४ भागांत विभागला गेला आहे: थर्ड-पार्टी इन्शुरन्स, पॅसेंजर कव्हर, पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर आणि ओन डॅमेज कव्हर. IRDAI ने २ तारखेला या बदलांची माहिती देणारे परिपत्रक जारी केले. १५ डिसेंबरपासून नव्या पॉलिसींना हा नियम लागू होईल.
१. थर्ड-पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) -
हा आधीपासूनच सक्तीचा आहे. तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीला किंवा मालमत्तेला नुकसान झाल्यास याची मदत होते. यात कोणताही बदल नाही.
२. पॅसेंजर कव्हर -
कारमधील प्रवासी किंवा बाईकवर मागे बसलेली व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांसाठी हे कव्हर आहे. ग्राहकांना हे ऐच्छिक (optional) असेल.
३. पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर (Personal Accident Cover) -
वाहनमालक आणि इन्शुरन्सधारक व्यक्तीसाठी हे कव्हर थर्ड-पार्टी प्रमाणेच सक्तीचे (mandatory) करण्यात आले आहे.
४. ओन डॅमेज इन्शुरन्स (Own Damage Insurance) -
अपघात, चोरी, आग किंवा नैसर्गिक आपत्तीत वाहनाचे नुकसान झाल्यास हे कव्हर कामी येते. हे देखील ऐच्छिक आहे. वाहनाची किंमत पाहून मालक निर्णय घेऊ शकतात.
प्रीमियम वाढणार का?
नवे नियम आल्याने कार आणि बाईक इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण, IRDAI ने प्रीमियम वाढीबाबत किंवा कपातीबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. कंपन्यांना 'ओन डॅमेज' इन्शुरन्सचा प्रीमियम ठरवण्याची मुभा दिली आहे.
तसेच, १५ डिसेंबरपर्यंत सर्व इन्शुरन्स कंपन्यांना 'बीमा सुगम' (Bima Sugam) या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मशी जोडले जाणे बंधनकारक आहे. यामुळे ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करणे आणि खरेदी करणे सोपे जाईल.
वाहनमालकांनी काय लक्षात ठेवावे?
नवी पॉलिसी घेताना थर्ड-पार्टी इन्शुरन्स आणि पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर सक्तीचे आहे, हे लक्षात ठेवा. बाकीचे कव्हर निवडताना तुमच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार नक्की करा. प्रत्येक कव्हरसाठी लागणारा प्रीमियम वेगवेगळा तपासा आणि मगच निर्णय घ्या.

