MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Toll Plaza Insurance Check : फास्टॅगच नाही, आता टोल नाक्यावर इन्शुरन्सही चेक होणार; 10,000 रुपयांचा दंड

Toll Plaza Insurance Check : फास्टॅगच नाही, आता टोल नाक्यावर इन्शुरन्सही चेक होणार; 10,000 रुपयांचा दंड

आता टोल नाका ओलांडल्यावर तुमच्या गाडीला इन्शुरन्स आहे की नाही हे अधिकारी ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाद्वारे शोधून काढतील. जर इन्शुरन्स संपला असेल तर लगेच एसएमएस येईल आणि नियम मोडल्यास १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 19 2026, 02:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
टोल नाक्यावर आता तुमची सुटका नाही!
Image Credit : Asianet News

टोल नाक्यावर आता तुमची सुटका नाही!

गाडीचा इन्शुरन्स संपल्यावरही अनेक जण तो रिन्यू न करता गाडी चालवतात. यामुळे अपघात झाल्यावर नुकसान भरपाईसारख्या बाबींमध्ये अनेक अडचणी येतात.

असे नियम मोडणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी NHAI ने टोल नाक्यावरच गाड्यांचा इन्शुरन्स चेक करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे.

याचा पहिला टप्पा दिल्लीतील Urban Extension Road-II (UER-II) रोडवरील मुंडका (Mundka) टोल नाक्यावर सुरू झाला आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा प्रोजेक्ट देशातील इतर भागातही लागू करण्याचा NHAI चा विचार असल्याची माहिती इंग्रजी माध्यमांनी दिली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
गाडीचा इन्शुरन्स कसा शोधणार?
Image Credit : X

गाडीचा इन्शुरन्स कसा शोधणार?

हे नवीन तंत्रज्ञान गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारावर इन्शुरन्सची माहिती चेक करेल.

यासाठी केंद्र सरकारच्या वाहन रजिस्ट्रेशनचा डेटा असलेल्या VAHAN डेटाबेसचा वापर केला जाईल. National Informatics Centre (NIC) च्या या डेटाबेससोबत गाडीचे डिटेल्स जुळवून पाहिले जातील.

यावेळी त्या गाडीचा इन्शुरन्स सुरू आहे की संपला आहे हे ऑटोमॅटिक पद्धतीने समजेल.

जर इन्शुरन्स संपला असल्याचे आढळले तर त्या गाडीच्या मालकाला काही मिनिटांतच एसएमएस अलर्ट पाठवला जाईल.

Related Articles

Related image1
Car Bike Insurance Rules : 15 डिसेंबरपासून कार-बाईक इन्शुरन्समध्ये मोठा बदल; आता 4 प्रकारच्या पॉलिसी, कोणती सक्तीची?
35
एसएमएसमध्ये कोणते तपशील असतील?
Image Credit : Asianet News

एसएमएसमध्ये कोणते तपशील असतील?

इन्शुरन्स नसलेल्या गाड्यांच्या मालकांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये महत्त्वाची माहिती असेल.

• गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर.

• टोल नाका ओलांडण्याची तारीख आणि वेळ.

• गाडीचा इन्शुरन्स संपलेली तारीख.

• इन्शुरन्स लगेच रिन्यू करण्याची सूचना.

यामुळे इन्शुरन्स संपला आहे हे माहीत नसताना गाडी चालवणाऱ्यांनाही लगेच माहिती मिळेल. त्याचबरोबर इन्शुरन्सशिवाय गाड्या चालवणाऱ्यांवर नजर ठेवणे सोपे होईल.

45
इन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास १०,००० रुपये दंड?
Image Credit : Asianet News

इन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास १०,००० रुपये दंड?

मोटार वाहन कायद्यानुसार, सार्वजनिक रस्त्यावर चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) अनिवार्य आहे.

हा इन्शुरन्स, तुमच्या गाडीमुळे दुसऱ्या व्यक्तीला अपघातात दुखापत, मृत्यू किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याच्या भरपाईसाठी आर्थिक सुरक्षा देतो.

अशा परिस्थितीत इन्शुरन्सशिवाय गाडी चालवणाऱ्यांना मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड होऊ शकतो.

नियमभंग - दंड

पहिल्यांदा मूलभूत इन्शुरन्स प्रीमियमच्या ३ पट किंवा ५,००० रुपये (यापैकी जास्त असलेली रक्कम)

दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर मूलभूत इन्शुरन्स प्रीमियमच्या ५ पट किंवा १०,००० रुपये (यापैकी जास्त असलेली रक्कम)

त्यामुळे इन्शुरन्सशिवाय गाडी चालवणे ही पहिली वेळ असली तरी दंड होऊ शकतो. पुन्हा तीच चूक केल्यास दंड १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक असू शकतो.

55
संपूर्ण देशभरात लागू होणार का?
Image Credit : x

संपूर्ण देशभरात लागू होणार का?

सध्या हा प्रोजेक्ट फक्त दिल्लीतील मुंडका टोल नाक्यावर पायलट तत्त्वावर राबवला जात आहे. ही चाचणी यशस्वी होऊन हे तंत्रज्ञान उत्तमरीत्या काम करत असल्याची खात्री झाल्यानंतर NHAI ही सिस्टीम देशभरातील इतर टोल नाक्यांवरही लागू करण्याचा विचार करत आहे.

यामुळे भविष्यात इन्शुरन्सशिवाय गाडी चालवणाऱ्यांना पकडणे आणखी सोपे होईल. त्यामुळे वाहन मालकांनी त्यांच्या इन्शुरन्सची मुदत संपण्याची तारीख तपासून वेळेवर रिन्यू करणे महत्त्वाचे आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Car Bike Insurance Rules : 15 डिसेंबरपासून कार-बाईक इन्शुरन्समध्ये मोठा बदल; आता 4 प्रकारच्या पॉलिसी, कोणती सक्तीची?
Recommended image2
Mahindra XUV 3XO CNG : २४ किलोमीटर मायलेज, महिंद्राची नवी CNG SUV लाँच
Recommended image3
Instagram Algorithm Update : आता नको असलेले रील्स दिसणार नाहीत, इन्स्टाग्रामने भारतात बदलला अल्गोरिदम!
Recommended image4
Gold Jewellery : आपण रोज घालतो ते सोनं वर्षभरात किती झिजतं माहितीये का?
Recommended image5
GTA 6 Blinkit : मिनीटांत हवीये GTA 6? ब्लिंकिटवर किंमत आणि ऑर्डर करण्याची सोपी पद्धत
Related Stories
Recommended image1
Car Bike Insurance Rules : 15 डिसेंबरपासून कार-बाईक इन्शुरन्समध्ये मोठा बदल; आता 4 प्रकारच्या पॉलिसी, कोणती सक्तीची?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved