NEET UG 2024 : नीट परीक्षा केंद्रात एण्ट्री ते ड्रेस कोड, विद्यार्थ्यांनी जाणून घ्या NTA च्या महत्त्वपूर्ण गाइडलाइन्स

| Published : May 04 2024, 02:41 PM IST / Updated: May 04 2024, 02:42 PM IST

NEET UG 2024 Application Form Correction Last Date
NEET UG 2024 : नीट परीक्षा केंद्रात एण्ट्री ते ड्रेस कोड, विद्यार्थ्यांनी जाणून घ्या NTA च्या महत्त्वपूर्ण गाइडलाइन्स
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

NEET UG 2024 : नीट युजी परीक्षा येत्या 5 मे रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. अशातच जाणून घ्या परीक्षा केंद्रात एण्ट्री ते ड्रेस कोडसाठी काय असणार नियम याबद्दल सविस्तर...

NEET UG 2024 Guidelines : नीट बोर्ड परीक्षा संपल्यानंतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सुरू झाल्या आहेत. जेईई मेन परीक्षेनंतर आता आता नीट युजी 2024 परीक्षा होणार आहे. नीट युजी परीक्षा 5 मे रोजी पार पडणार आहे. 12 वी नंतर होणाऱ्या नीट युजीच्या परीक्षेसाठी जवळजवळ 24 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) कडून नीट युजी परीक्षेसाठी काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

नीट परीक्षा देशातच नव्हे संपूर्ण जगातील कठीण परीक्षेपैकी एक आहे. नीट युजी परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड एनटीएची अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET येथून डाउनलोड करू शकता. परीक्षेसाठी हॉल तिकीटाशिवाय विद्यार्थ्याला बसता येणार नाही.

NEET UG 2024 परीक्षेसाठीच्या गाइडलाइन्स
भारतातील वैद्यकीय महिलाविद्यालयात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. नॅशनल टेस्टिंग एजेंसी, एनटीएने सोशल मीडियावर नीट युजी परीक्षा केंद्रासाठी काही महत्त्वाच्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

 • विद्यार्थ्यांना नीट युजी अ‍ॅडमिट कार्ड वर रिपोर्टिंग/एण्ट्री टाइमनुसार परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे.
 • परीक्षा केंद्राचा गेट बंद झाल्यानंतर कोण्यात्याही विद्यार्थ्याला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
 • पेपर संपल्यानंतर परीक्षकाला त्याची माहिती द्यावी. परीक्षकाच्या परवानगीनंतरच परीक्षा केंद्रातून निघावे.
 • सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी नीट अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करून ठेवावे. याशिवाय सर्व नियमांचे पालन देखील करावे.
 • नीट युजी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याआधी त्यावर लिहिलेली सर्व माहिती योग्य आणि व्यवस्थितीत आहे का हे तपासून पहावे.
 • परीक्षेआधी विद्यार्थ्यांनी परीक्षेचे केंद्र कुठे आहे हे पाहावे.
 • कोणत्याही विद्यार्थ्याला अ‍ॅडमिट कार्ड, वैध आयडी कार्ड आणि तपासाशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
 • विद्यार्थ्यांना नीट युजी परीक्षा केंद्रावर ट्रांन्सपेरेंट पाण्याची बाटली, एक फोटो, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसह अ‍ॅडमिट कार्डची एक कॉपी, अंडरटेकिंग फॉर्मवर सर्व माहिती हाताने भरलेली असावी आणि पीडब्लूडी सर्टिफिकेट आणि स्क्राइबसंबंधित कागदत्रेच सोबत घेऊन जाता येणार आहेत.
 • फोटो आणि स्वाक्षरी योग्य ठिकाणी करावी.
 • विद्यार्थ्याला सोबत ओखळपत्र घेऊन जावे लागेल.
 • पीडब्लूडी विद्यार्थ्यांनी सोबत जात प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे.
 • इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मोबाइल फोनसारख्या गोष्टी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ नये. कारण नीट परीक्षा केंद्रावर एखाद्या मौल्यवान वस्तूची सुरक्षितता करण्यासाठी व्यवस्था केली जाणार नाही.
 • परीक्षा केंद्रावर रफ कामासाठी रिकामी शीट उपलब्ध करून दिली जाणार नाही.
 • सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही आणि जॅमरची व्यवस्थ केली जाणार आहे.
 • पेपर पूर्ण झाल्यानंतर आपली मूळ शीट आणि ऑफिस कॉपी जमा करण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना आपल्यासोबत केवळ टेस्ट बुक घेऊन जाता येणार आहे.
 • परीक्षेचा एक तास आणि अखेरच्या अरध्या तासात कोणत्याही विद्यार्थ्याला बायो ब्रेक दिला जाणार नाही.
 • एण्ट्री करतेवेळी बायोमॅट्रिक अडेंटेंस आणि तपासणीसह बायो ब्रेकनंतरच परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेशाची वेळ आणि उपस्थिती पुन्हा तपासून पाहिली जाणार आहे.
 • परीक्षेत कॉपी करण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून कठोर व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुलींसाठी ड्रेस कोड

 • हाफ स्लिव्ह्ज कुर्ता किंवा शर्ट
 • लॉन्ग डिझाइन सिल्व्ह्जवर डिझाइन असणारे कपडे परिधान करण्यास बंदी आहे.
 • मेटॅलिक किंवा नॉन-मेटॅलिक ज्वेलरी घालता येणार नाही.
 • स्लिपर्स किंवा सँडल्स घालू शकता.
 • फॅन्सी फुटवेअर घालण्यास बंदी असणार आहे.

मुलांसाठी ड्रेस कोड

 • शॉर्ट हॅण्डचे टी-शर्ट्स
 • शर्टाला किंवा जीन्सला अत्याधिक पॉकेट्स, बटणे असतील असे कपडे परिधान करू नयेत.
 • सिंपल पँट आणि शर्ट परिधान करावे.
 • कुर्ता आणि पजामा घालण्यास बंदी असणार आहे.
 • स्लिपर्स किंवा सँडल्स घालावेत.
 • फुटवेअर सिंपल आणि पूर्णपणे झाकलेले नसावेत.

आणखी वाचा : 

EPFO देणार 50 हजार रुपयांचा बोनस, केवळ 'ही' अटक पूर्ण करावी लागणार

Maharashtra HSC Board Results 2024 : 12 वी बोर्डाचा निकाल या तारखेला लागण्याची शक्यता, येथे तपासून पाहता येईल रिजल्ट