MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'नमो शेतकरी' योजनेचा ८ वा हप्ता जमा; ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १८०० कोटी ट्रान्सफर

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'नमो शेतकरी' योजनेचा ८ वा हप्ता जमा; ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १८०० कोटी ट्रान्सफर

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र सरकारने 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा 8 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना १८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, लाभार्थी nsmny.mahait.org या वेबसाइटवर आपले स्टेटस तपासू शकतात.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 25 2026, 08:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'नमो शेतकरी' योजनेचा ८ वा हप्ता जमा
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'नमो शेतकरी' योजनेचा ८ वा हप्ता जमा

मुंबई: राज्यातील बळीराजासाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १८०० कोटी रुपयांचा निधी थेट वर्ग (DBT) करण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
काय म्हणाले मुख्यमंत्री?
Image Credit : Getty

काय म्हणाले मुख्यमंत्री?

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, “केंद्र सरकारचे ६,००० आणि राज्य सरकारचे ६,००० रुपये अशा एकत्रित मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. आतापर्यंत दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ५४ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.” 

Related Articles

Related image1
शेतकऱ्यांनो सावधान! 'Agristack' पोर्टलवर ही चूक पडू शकते महाग; कर्जमाफीसह सरकारी योजनांचा लाभ धोक्यात!
Related image2
देशावर इंधन संकट? पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर सरकारी कंपनीने अखेर सत्य सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवू नका!
34
तुमचे पैसे आले का? 'असे' तपासा स्टेटस (Step-by-Step Guide)
Image Credit : Getty

तुमचे पैसे आले का? 'असे' तपासा स्टेटस (Step-by-Step Guide)

तुमच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर nsmny.mahait.org ही लिंक ओपन करा.

२. Beneficiary Status निवडा: होमपेजवर तुम्हाला 'Beneficiary Status' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

३. मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर: स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर यापैकी एक पर्याय निवडू शकता.

४. कॅप्चा कोड भरा: तुमचा नंबर टाकल्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अचूक भरा आणि 'Get Data' वर क्लिक करा. तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. 

44
नोंदणी क्रमांक माहित नसेल तर काय करावे?
Image Credit : iSTOCK

नोंदणी क्रमांक माहित नसेल तर काय करावे?

जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल, तर तिथेच असलेल्या 'Know Your Registration No' या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP भरल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन
Recommended image2
Kitchen Tips: पहिल्यांदाच स्वयंपाक करताय? मग या किचन टिप्स नक्की लक्षात ठेवा
Recommended image3
Mobile Lost: 10 मिनिटांत करा 'या' 5 गोष्टी, नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामं!
Recommended image4
Kitchen Tips: कुकर छोटा असो वा मोठा, पाणी बाहेर येणार नाही! वापरा ही सोपी ट्रिक
Recommended image5
Kitchen Tips: तुम्ही मासे फ्रिजमध्ये स्टोअर करता? मग हे आधी नक्की वाचा
Related Stories
Recommended image1
शेतकऱ्यांनो सावधान! 'Agristack' पोर्टलवर ही चूक पडू शकते महाग; कर्जमाफीसह सरकारी योजनांचा लाभ धोक्यात!
Recommended image2
देशावर इंधन संकट? पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर सरकारी कंपनीने अखेर सत्य सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवू नका!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved