MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • देशावर इंधन संकट? पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर सरकारी कंपनीने अखेर सत्य सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवू नका!

देशावर इंधन संकट? पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर सरकारी कंपनीने अखेर सत्य सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवू नका!

India fuel crisis rumors: सोशल मीडियावर पसरलेल्या इंधन टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढली. या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियमने (BPCL) स्पष्ट केले आहे की देशात इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा साखळी सुरळीत आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 25 2026, 04:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
देशावर इंधन संकट? पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर सरकारी कंपनीने अखेर सत्य सांगितलं
Image Credit : X

देशावर इंधन संकट? पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर सरकारी कंपनीने अखेर सत्य सांगितलं

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. एलपीजी गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलचाही तुटवडा भासणार, या भीतीने अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या वाढत्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला असून सरकारी तेल कंपनीने मोठी घोषणा केली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
काय म्हणतेय भारत पेट्रोलियम (BPCL)?
Image Credit : X

काय म्हणतेय भारत पेट्रोलियम (BPCL)?

वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की,

पुरवठा सुरळीत: देशभरातील इंधन पुरवठा साखळी (Supply Chain) पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत आहे. कोणत्याही राज्यात किंवा शहरात इंधनाचा तुटवडा नाही.

उत्पादन सुरू: देशात पूर्ण क्षमतेने तेल उत्पादन आणि वितरण सुरू असून, भविष्यातही यात कोणताही अडथळा येणार नाही.

निर्यातदार देश: भारत सध्या पेट्रोल आणि डिझेलचा निव्वळ निर्यातदार (Net Exporter) देश आहे. म्हणजेच आपल्याकडे स्वतःची गरज भागवून दुसऱ्या देशांना इंधन देण्याइतका साठा उपलब्ध आहे. 

Related Articles

Related image1
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! १ जानेवारी २०११ पूर्वीची १५०० चौ. फुटांपर्यंतची घरे होणार नियमित
Related image2
डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा; पाहा लोकलच्या वेळेत काय बदल होणार?
34
अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
Image Credit : ChaGPT

अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

बीपीसीएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. "इंधन संपणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. नागरिक विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करून स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत. सप्लाय चेनमध्ये कोणतीही बाधा आलेली नाही," असे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

44
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे
Image Credit : X

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे

१. देशात हवाई इंधन (ATF), पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा आहे.

२. आखाती देशांमधील तणावाचा सध्या भारतीय इंधन उपलब्धतेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

३. विनाकारण इंधन साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नका.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
भारताचे बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Bengaluru Bike Stunt: बंगळुरूच्या जयनगरमध्ये तरुणाचा धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Kotagiri Truck Accident: तमिळनाडूच्या कोठागिरीत लाकडांनी भरलेला ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला
Recommended image3
Nandini Milk Price: कर्नाटकात दुधाचे दर वाढले, काही प्रकारांवर १२ रुपयांची वाढ का?
Recommended image4
Kannada Song: म्युनिकमध्ये जर्मन महिलेने गायलं 'करुनाडा तायी', व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Jharkhand Italian Pizza: झारखंडच्या गावात आदिवासी महिला बनवतायत अस्सल इटालियन पिझ्झा!
Related Stories
Recommended image1
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! १ जानेवारी २०११ पूर्वीची १५०० चौ. फुटांपर्यंतची घरे होणार नियमित
Recommended image2
डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा; पाहा लोकलच्या वेळेत काय बदल होणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved