Mumbai University PG Admission 2024 : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, येथे पाहा महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

| Published : May 24 2024, 08:12 AM IST / Updated: May 24 2024, 08:14 AM IST

Mumbai University
Mumbai University PG Admission 2024 : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, येथे पाहा महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Mumbai University PG Admission 2024 : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

Mumbai University PG Admission 2024 Registration : मुंबई विद्यापीठीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2024 च्या पदव्युत्तर शिक्षणासाठी रजिस्ट्रेशन लिंकही उपलब्ध करून दिली आहे. अशातच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन फॉर्म भरावा लागणार आहे. यासाठी मुंबई महाविद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ muadmission.samarth.ac.in. येथे अर्ज करण्यासह अन्य महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

अर्ज करण्याची अखेरची तारीख
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया 22 मे पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 जून 2024 आहे. या तारखेच्या कालावधीतच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. 15 जूनला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहे. यामुळे दिलेल्या मर्यादित कालावधीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावे अशी सूचनाही विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठई रजिस्ट्रेशन 22 मे ते 22 जून पर्यंत करता येणार आहे.
  • कागदपत्रांची पडताळणी 20 जून पर्यंत पूर्ण केली जाईल.
  • पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 21 जूनला जाहिर केली जाईल.
  • विद्यार्थ्यांना एखादी तक्रार असल्यास त्यांनी 25 जूनपर्यंत करावी.
  • फायनल मेरिट लिस्ट 26 जूनला जारी केली जाईल.
  • मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांनी सीट स्विकारल्यास त्यांनी 27 जून ते 1 जून दरम्यान फी भरावी.
  • दुसरी मेरिट लिस्ट 2 जुलैला जाहीर केली जाणार आहे.
  • दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी ऑनलाइन पेमेंट 3 जुलै ते 5 जुलै, 2024 दरम्यान करावे लागणार आहे.
  • यानंतर वर्ग सुरू होतील. दरम्यान, पहिल्याच मेरिट लिस्टनंतरच 1 जुलै पासून वर्ग सुरू होतील. अन्य प्रवेश प्रक्रियाही पूर्ण होत राहिल.

असा करा अर्ज

  • मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी रजिस्ट्रेश करायचे असल्यास muadmission.samarth.ac.in. या संकेतस्थळाला भेट द्या.
  • येथे होमपेजवर एक लिंक दिसेल त्यावर ‘New Candidate Registration Link’ पर्यायावर क्लिक करा.
  • नवे पेज सुरू होईल. या पेजवर काही महत्त्वाची माहिती देत अर्जाचा फॉर्म भरावा लागेल.
  • फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल.
  • पुढील टप्प्यात फी भरा. फी विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनेही भरता येणार आहे.
  • फॉर्म सबमिट करण्याआधी व्यवस्थितीत वाचा.
  • आता कंन्फर्मेशन पेजला डाउनलोड करा. अथवा प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

याशिवाय अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंकसाठी येथे क्लिक करा.

आणखी वाचा : 

प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या फोनमध्ये सेव्ह असावेत हे 4 महत्त्वाचे क्रमांक, लगेच होईल समस्येचे निवारण

पत्नी-मुलं ते आई-वडिलांना EPFO च्या माध्यमातून मिळतात या 7 पेन्शन सुविधा, असा घ्या लाभ