MG Comet EV November 2025 Discount : नोव्हेंबर २०२५ मध्ये MG Comet EV खरेदीवर 56,000 पर्यंत बचत करण्याची संधी. कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सवलत असलेल्या या ऑफरमुळे शहरी प्रवासासाठी योग्य असलेली ही इलेक्ट्रिक कार अधिक आकर्षक झाली आहे.
MG Comet EV November 2025 Discount : तुम्ही शहरासाठी योग्य आणि परवडणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नोव्हेंबर २०२५ तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. कारण, MG मोटरने त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV वर शानदार ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या महिन्यात, तुम्ही ही कार खरेदी करून ५६,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. चला, नोव्हेंबर २०२५ मध्ये MG Comet EV वर उपलब्ध असलेल्या सविस्तर डिस्काउंट ऑफर्स पाहूया.
तब्बल २८ हजार रुपयांचा कॅशबॅक
या महिन्यात MG आपल्या Comet EV वर एकूण ५६,००० रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यामध्ये २८,००० रुपयांच्या कॅश डिस्काउंटचा समावेश आहे. ही ऑन-रोड किमतीत थेट कपात आहे, ज्यामुळे ही ऑफर सर्वात आकर्षक बनते. याशिवाय, कंपनी २०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनसही देत आहे. तुमच्या कुटुंबात आधीपासूनच MG कार असेल, तर तुम्हाला हा अतिरिक्त बोनस मिळू शकतो. ८,००० रुपयांची कॉर्पोरेट सवलत आहे. निवडक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त फायदेही मिळतील. जुन्या किमतीच्या यादीतील Comet EV (7kW ACFC किंवा 3kW AC) अजूनही तुमच्या शहरात स्टॉकमध्ये असल्यास, तुम्हाला जुनी किंमत आणि या महिन्याची सवलत दोन्ही मिळू शकते.

सिंगल चार्जमध्ये २३० किलोमीटर
MG Comet EV मध्ये 17.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 42PS पॉवर आणि 110Nm टॉर्क निर्माण करते. ही कार ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर MG Comet सुमारे 230 किलोमीटर धावू शकते. 7.4 kW चार्जरने 0 ते 100% चार्ज होण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात, तर 3.3 kW चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे सात तास लागतात.

डीलरशी संपर्क साधा
लक्षात घ्या की, वर दिलेली सवलत विविध प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने कारवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. ही सवलत देशातील विविध राज्ये, शहरे, डीलरशिप, स्टॉक, रंग आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते. म्हणजेच, ही सवलत तुमच्या शहरात किंवा डीलरकडे कमी-जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, कार खरेदी करण्यापूर्वी, अचूक सवलतीची माहिती आणि इतर तपशिलांसाठी तुमच्या जवळच्या स्थानिक डीलरशी संपर्क साधा.


