- Home
- Utility News
- बाबो, Tata Motors ची Tiago खातीये भाव, Maruti Suzuki च्या Swift ला देतीये जोरदार टक्कर!
बाबो, Tata Motors ची Tiago खातीये भाव, Maruti Suzuki च्या Swift ला देतीये जोरदार टक्कर!
Tata Tiago A Popular Choice : उत्तम मायलेज, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रीमियम इंटीरियरमुळे, ही टाटा कार मारुती स्विफ्टला जोरदार टक्कर देत आहे. चला, या गाडीची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

टाटाची कार
टाटा नॅनो भारतात लाँच झाल्यावर तिला मिळालेला प्रतिसाद सर्वांना माहीत आहे. तोच उत्साह पुन्हा निर्माण करत टाटा टियागोला सध्या बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहान कुटुंबांसाठी योग्य, किफायतशीर आणि सुरक्षिततेच्या बाबतीतही विश्वासार्ह असल्याने अनेकजण या गाडीला पसंती देत आहेत.
किंमत आणि तपशील
टाटा टियागो NRG ची एक्स-शोरूम किंमत ₹7.30 लाख ते ₹8.85 लाख आहे. मारुती स्विफ्टच्या तुलनेत ही किंमत स्पर्धात्मक आहे. राज्यानुसार किंमत बदलू शकते, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील किंमत तपासा.
मायलेजमध्ये मोठी आघाडी
लांबच्या प्रवासात बचत करणाऱ्यांसाठी टियागो उत्तम आहे. पेट्रोलमध्ये 20.09 kmpl आणि CNG मध्ये 26.49 km/kg मायलेज देते. टाटाच्या गाड्या सुरक्षित असल्याने, कुटुंबासाठी हा एक विश्वासार्ह पर्याय आहे.
स्विफ्टपेक्षा वेगळे व्हेरिएंट
टियागोचे डिझाइन स्विफ्टपेक्षा खूप वेगळे आहे. टाटाने टियागो NRG ला क्रॉस-हॅचबॅक डिझाइन दिले आहे. यामुळे तिला सामान्य हॅचबॅकऐवजी मिनी SUV चा लूक मिळतो. जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि प्लास्टिक क्लॅडिंगमुळे तिला रग्ड लूक येतो.
लक्झरी इंटीरियर + प्रीमियम टेक फीचर्स
या मॉडेलच्या केबिनमध्ये मोठे बदल आहेत. इंटीरियरला आता अधिक प्रीमियम लूक मिळतो. मोठी टचस्क्रीन आणि सुधारित डॅशबोर्ड चांगला अनुभव देतात. स्टाईल आणि सुरक्षितता शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम कार आहे.

