MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Royal Enfield Classic 350 Mileage
Sanju Samson
Gold Rate Today
EPFO WhatsApp Services
SIP Calculator
Kitchen Tips
8th Pay Commission
Indoor Bedrooms Plants
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! मेट्रो ११ आता थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत; पाहा काय आहे 'मेगा प्लॅन'

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! मेट्रो ११ आता थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत; पाहा काय आहे 'मेगा प्लॅन'

Mumbai Metro 11 extension plan: मुंबईची मेट्रो ११ (ग्रीन लाईन) वडाळ्यापासून थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत धावणार आहे. जपानच्या ५,५०० कोटींच्या मदतीने या विस्तारित मार्गाला गती मिळणार असून, यामुळे मध्य, पश्चिम उपनगरे थेट जोडली जातील.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 26 2026, 03:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! मेट्रो ११ आता थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत
Image Credit : Asianet News

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! मेट्रो ११ आता थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत

मुंबई: मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची लाडकी 'ग्रीन लाईन' म्हणजेच मेट्रो ११ (Metro 11) आता केवळ वडाळ्यापर्यंत मर्यादित न राहता थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत धावणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपानने मदतीचा हात दिला असून निधीचा मार्गही मोकळा झाला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
जपानकडून ५,५०० कोटींचे बळ!
Image Credit : X@OfficialUPMetro

जपानकडून ५,५०० कोटींचे बळ!

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकार आणि 'जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था' (JICA) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार प्रकल्पासाठी सुमारे ५,५०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, यामुळे कामाला मोठी गती मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून राजकारण तापले; शीतल म्हात्रेंच्या ट्विटने नवा वाद पेटला
Related image2
ST Bus Big Update: आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'; प्रवाशांनाही मिळणार मोठे फायदे
36
असा असेल नवीन मेट्रो मार्ग (मेट्रो ११)
Image Credit : X@OfficialUPMetro

असा असेल नवीन मेट्रो मार्ग (मेट्रो ११)

मूळ मार्ग: वडाळा (आणिक डेपो) ते गेटवे ऑफ इंडिया.

नवा विस्तार: आता हा मार्ग धारावीमार्गे वांद्रे टर्मिनसपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

एकूण लांबी: साधारण १७.५१ किमी.

स्थानके: एकूण १४ स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी बहुतांश स्थानके भूमिगत (Underground) असतील.

नवीन भर: धारावी ते वांद्रे या ६.९ किमीच्या नवीन विस्तारामुळे ताफ्यात ५ नवीन स्थानके जोडली जातील. 

46
काय होणार फायदा?
Image Credit : X@OfficialUPMetro

काय होणार फायदा?

१. थेट कनेक्टिव्हिटी: मध्य आणि पश्चिम उपनगरे मेट्रोने थेट जोडली जातील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल.

२. महत्त्वाच्या प्रकल्पांशी सांगड: हा मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) आणि मुंबई पोर्ट वॉटरफ्रंटला जोडला जाणार असल्याने दळणवळण अधिक सुलभ होईल.

३. प्रदूषणमुक्त प्रवास: वांद्रे टर्मिनस गाठण्यासाठी आता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज उरणार नाही. 

56
कधी धावणार ही मेट्रो?
Image Credit : Asianet News

कधी धावणार ही मेट्रो?

अंमलबजावणी: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC).

एकूण खर्च: सुमारे २३,४८७ कोटी रुपये.

कामाची सुरुवात: २०२७ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

डेडलाईन: ऑगस्ट २०३२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 

66
मेट्रो ११ मुंबईच्या विकासाला नवी गती देणार
Image Credit : X

मेट्रो ११ मुंबईच्या विकासाला नवी गती देणार

मेट्रो ११ चा वांद्रे टर्मिनसपर्यंतचा विस्तार हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून, तो मुंबईच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारा 'गेम चेंजर' ठरणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Cooking Oil: शेंगदाणा की सूर्यफूल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या सत्य!
Recommended image2
Volvo XC60 Plug-in Hybrid : व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI OMO Sale : आरबीआयने 50 हजार कोटींच्या सरकारी रोख्यांची विक्री केली पूर्ण
Recommended image4
Meta Child Safety : इन्स्टाग्रामवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा, केंद्राने मेटाला कसा लावला चाप?
Recommended image5
Volvo XC60 Plug-in Hybrid: व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल!
Related Stories
Recommended image1
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून राजकारण तापले; शीतल म्हात्रेंच्या ट्विटने नवा वाद पेटला
Recommended image2
ST Bus Big Update: आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'; प्रवाशांनाही मिळणार मोठे फायदे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved