- Home
- Utility News
- मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार तब्बल ३ लाखांचा डिस्काउंट, सर्वच गाड्यांच्या किंमती झाल्या कमी
मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार तब्बल ३ लाखांचा डिस्काउंट, सर्वच गाड्यांच्या किंमती झाल्या कमी
मारुती सुझुकी आपल्या नेक्सा विभागातील लोकप्रिय गाड्यांवर मोठी सवलत देत आहे. यामध्ये इनविकटो, सियाज, जिम्मी, इग्निस आणि फ्रॉक्स यांसारख्या मॉडेल्सचा समावेश असून, ग्राहकांना तब्बल २.१५ लाख रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी आहे.

मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार तब्बल ३ लाखांचा डिस्काउंट, सर्वच गाड्यांच्या किंमती झाल्या कमी
देशभरातील मध्यमवर्गामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या प्रचंड लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या नेकसा विभागातील गाड्यांवर आता ऑफर सुरु करण्यात आली असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
Maruti Invicto
मारुती सुझुकी कंपनीच्या इनविकटो या गादीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑफ भेटणार आहे. या गाडीची किंमत २४.९७ लाखांपासून सुरु होत असून तीच टॉप मॉडेल हे २८.६१ लाख रुपयांना मिळतं. त्या गादीवर तब्बल २.१५ लाखांचा ऑफ भेटणार आहे.
Maruti Ciaz
कार विभागात मारुती सियाज हि गाडी आतापर्यंत चांगली चालली आहे. या गाडीची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली असून या गादीवर तब्बल १.३० लाखांचा ऑफ भेटणार आहे. या गाडीची किंमत ९.०९ लाखांपासून सुरु होत असून टॉप मॉडेल हे ११.८९ लाख रुपयांपर्यंत जातं.
Maruti Jimmy
मारुती जिम्मी हि गाडी जीप प्रकारात मोडत असून थार गाडीला टक्कर देण्यासाठी ती मार्केटमध्ये आली होती. त्या गाडीची किंमत १२.३२ लाखांपासून सुरु होत असून टॉप मॉडेल हे १४.४५ लाखांपर्यंत जातं.
Maruti Ignis (AMT)
मारुती कंपनीची इग्निस गाडी घेणाऱ्या ग्राहकांचा एक वेगळाच वर्ग आहे. या गाडीला ग्राहक आवडीने घेत असतात. या गादीवर तब्बल ६०,००० रुपयांचा ऑफ भेटणार आहे.
Maruti Fronx
मारुती कंपनीची फ्रॉक्स हि गाडी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. या गाडीला ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळं ग्राहक आवडीने खरेदी करतात. या गादीवर ग्राहकांना तब्बल ८८,००० रुपयांचा ऑफ भेटणार आहे.

