- Home
- Utility News
- Maruti Suzuki कडून नोव्हेंबरमध्ये बंपर ऑफर, Invicto ते Jimny वर 2.18 लाखांपर्यंत डिस्काऊंट!
Maruti Suzuki कडून नोव्हेंबरमध्ये बंपर ऑफर, Invicto ते Jimny वर 2.18 लाखांपर्यंत डिस्काऊंट!
Maruti Suzuki November Offers : मारुती सुझुकीने नोव्हेंबर महिन्यासाठी आपल्या कारवर मोठ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स ग्राहक सूट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे अशा अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

मारुती कार ऑफर
नोव्हेंबर महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मारुती सुझुकीने मोठ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि चांगल्या डिस्काउंटची वाट पाहत असाल, तर या महिन्यात तुम्ही 2.18 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. नेक्सा आणि एरिना शोरूममध्ये उपलब्ध असलेल्या अनेक लोकप्रिय कार मॉडेल्सवर सूट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅप बोनस अशा विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत.
नोव्हेंबर कार डिस्काउंट
मारुती बलेनोच्या MT, AMT, आणि CNG अशा सर्व व्हेरिएंटवर ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. MT आणि CNG मॉडेल खरेदी करणाऱ्यांना 38,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. AMT मॉडेलवर 43,000 रुपयांपर्यंत सूट मिळत असल्याने, ही हॅचबॅक सध्या खूप चर्चेत आहे.
2.18 लाखांची सूट
मारुती ग्रँड विटारा खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अतिरिक्त फायदा मिळणार आहे. सिग्मा मॉडेलवर 1,21,500 रुपये, डेल्टा मॉडेलवर 1,23,000 रुपये, तर Zeta/Zeta(O), AllGrip, Alpha(O) मॉडेल्सवर 1,23,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. स्ट्रॉंग हायब्रिड मॉडेलवर सर्वाधिक 1,73,000 रुपयांपर्यंत ऑफर असल्याने, हायब्रिड SUV शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.
जिम्नीवर खास ऑफर
मारुती जिम्नीच्या Zeta आणि Alpha मॉडेल्सवर विशेष ऑफर्स आहेत. Zeta मॉडेलवर फक्त 8,000 रुपयांचा फायदा मिळत असला तरी, Alpha मॉडेलवर 83,000 रुपयांपर्यंत सूट आहे. तसेच, मारुती इनव्हिक्टोच्या Zeta+ आणि Alpha+ मॉडेल्सवर अनुक्रमे 1,93,000 आणि 2,18,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे.
फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत
XL6 SUV मॉडेलवर एकूण 43,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. यात 10,000 रुपयांची ग्राहक सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 3,000 रुपयांचा CRM फायदा यांचा समावेश आहे. रशलेनने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफर्स फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर या संधीचा फायदा घेऊ शकता.

